वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे औषधे नकारात्मक स्पंदनांनी भारीत होणे; त्यांवर तुळशीपत्र ठेवल्यामुळे त्यांतील (औषधांमधील) नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा
स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले समष्टीशी एकरूप झालेले ‘परात्पर गुरु’पदावरील ‘समष्टी संत’ असल्याने त्यांच्यात पुष्कळ चैतन्य आहे. त्यांच्याकडून वातावरणात सतत चैतन्य प्रक्षेपित होत असते. त्याचा समष्टीला लाभ होतो. परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महान कार्य करत असल्याने त्यांच्यावर सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्तींची सतत आक्रमणे होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. (‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर जिवंत असणे अत्यंत आवश्यक आहे’, असे महर्षींनी आणि संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. वर्ष २००७ पासून परात्पर गुरु डॉक्टरांवर अनेकदा महामृत्यूयोगाचे संकट आले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, यासाठी महर्षि आणि संत यज्ञयाग, अनुष्ठाने, तसेच काही आध्यात्मिक उपाय करण्यास सांगतात.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना होणार्‍या शारीरिक त्रासांवर वेळोवेळी वैद्यकीय उपचार करण्यात येतात. फेब्रुवारी २०२० पासून त्यांच्या औषधांवरही वाईट शक्तींची आक्रमणे होत असल्याचे लक्षात आले. कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या औषधांवर तुळशीपत्र ठेवण्यास सांगितले. ‘औषधांवर तुळशीपत्र ठेवल्याने त्यांवर (औषधांवर) काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व दर्शवणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत औषधांच्या गोळ्यांची पाकिटे (Strip), सलाईनच्या बाटल्या (Saline), इंजेक्शन (Ampule) अशा विविध औषधांवर तुळशीपत्र ठेवण्यापूर्वी आणि त्यांवर १२ ते २४ घंटे तुळशीपत्र ठेवल्यानंतर त्यांच्या (औषधांच्या) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. औषधांवर तुळशीपत्र ठेवल्यानंतर त्यांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे

चाचणीतील औषधांमध्ये आरंभी (तुळशीपत्र ठेवण्यापूर्वी) ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा होत्या. त्यांची प्रभावळ पुढे दिली आहे.

चाचणीतील औषधे औषधांमधील नकारात्मक
ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
‘इन्फ्रारेड’ ऊर्जा ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा
१. Tab. Lopamax ४.२४ २.७०
२. Tab. Colicure ४.५० ३.३०
३. I.V. Dextrose 25% ४.५० ३.१८
४. I.V. D.N.S. 500 ml ३.६७ २.४७
५. I.V. Dextrose 5% 500 ml ४.०२ २.५३
६. I.V. Ringer Lactate 500 ml ४.७४ ३.३४
७. Inj. Diaclofenac (Jonac) ४.५५ २.८२

चाचणीतील विविध औषधांवर तुळशीपत्र ठेवल्यानंतर त्यांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. तेव्हा प्रत्येक औषधाच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने ० अंशाचा कोन केला. (चाचणीतील घटकांच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’ने ० अंशाचा दर्शवणे हे त्या घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा नसल्याचे निर्देशक आहे.)

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. औषधांवर तुळशीपत्र ठेवल्यानंतर त्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

चाचणीतील औषधांमध्ये आरंभी (तुळशीपत्र ठेवण्यापूर्वी) सकारात्मक ऊर्जा नव्हती. तुळशीपत्र ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांची प्रभावळ पुढे दिली आहे.

चाचणीतील औषधे औषधांच्या सकारात्मक
ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
१. Tab. Lopamax ४.६४
२. Tab. Colicure ४.८७
३. I.V. Dextrose 25% ४.१४
४. I.V. D.N.S. 500 ml ६.१४
५. I.V. Dextrose 5% 500 ml ४.५४
६. I.V. Ringer Lactate 500 ml ३.५४
७. Inj. Diaclofenac (Jonac) ४.६९
२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

टीप – एकूण प्रभावळ (ऑरा) : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

२ इ १. चाचणीतील औषधांची एकूण प्रभावळ
चाचणीतील औषधे औषधांची एकूण प्रभावळ (मीटर)
तुळशीपत्र
ठेवण्यापूर्वी
तुळशीपत्र
ठेवल्यानंतर
एकूण प्रभावळीत
झालेली वाढ किंवा घट
१. Tab. Lopamax ४.६० ६.२५ १.६५ (वाढ)
२. Tab. Colicure ५.६० ६.८० १.२० (वाढ)
३. I.V. Dext 25% ६.७० ५.३२ १.३८ (घट)
४. I.V. D.N.S. 500 ml ५.७८ ७.५० १.७२ (वाढ)
५. I.V. Dext 5% 500 ml ५.२६ ६.७५ १.४९ (वाढ)
६. I.V. R.L. 500 ml ६.१८ ४.८६ १.३२ (घट)
७. Inj. Diaclo (Jonac) ५.३८ ६.५२ १.१४ (वाढ)

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. तुळशीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे वातावरणातील रज-तम नष्ट होणे

तुळशीत श्रीविष्णुतत्त्व असते. तुळस सदैव देवतेचे तत्त्व प्रक्षेपित करत असल्यामुळे ती सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि पवित्र करते. (‘तुळशीचे झाड २४ घंटे प्राणवायू सोडते’, असे विज्ञानही सांगते.) वातावरणातील रज-तमाचा परिणाम प्रत्येक वस्तूवर होत असतो. तुळशीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे वातावरणातील रज-तम नष्ट होते. (ग्रहणाच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचा संचार वाढल्याने वातावरण दूषित होते. यापासून रक्षण होण्यासाठी ग्रहणकाळात तुळशीच्या पानांचा उपयोग करण्यास सांगितले जाते.) थोडक्यात, तुळस ही सात्त्विक वनस्पती असून तिच्यामुळे वातावरणाची सतत शुद्धी होते. त्यामुळे पूर्वी घराघरांत प्रवेशद्वारापाशी ‘तुळशी वृंदावन’ असायचे. घरातील स्त्रिया भक्तीभावाने तुळशीचे पूजन करून तिला नमस्कार अन् प्रार्थना करत. तसेच सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावीत. आजच्या विज्ञानयुगातही ग्रामीण भागांत ही परंपरा जोपासली जाते.

३ आ. वाईट शक्तींनी औषधांवर आक्रमण करून ती त्रासदायक स्पंदनांनी भारीत करणे

एखाद्या व्यक्तीला शारिरीक त्रास किंवा व्याधी असल्यास त्यातून ती बरी व्हावी, यासाठी आधुनिक वैद्य (डॉक्टर) तिला औषध देतात. चाचणीतील औषधांवर वाईट शक्तींनी आक्रमण करून ती त्रासदायक स्पंदनांनी भारीत केली होती. ती औषधे रुग्णाला दिल्यास तो स्वस्थ (बरा) होण्याऐवजी उलट त्याचा जीव (प्राण) धोक्यात येईल. परात्पर गुरु डॉक्टरांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मार्च-एप्रिल मासांत त्यांची प्राणशक्ती अत्यंत अल्प असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. हे लक्षात घेऊन वाईट शक्तींनी औषधांवरच जोरदार आक्रमण चढवून ती नकारात्मक स्पंदनांनी भारीत केली. यातून ‘वाईट शक्ती कशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांचे देहधारी अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत’, हे लक्षात येते. तसेच ‘सूक्ष्मातील वाईट शक्तींचे युद्ध अंतिम टप्प्याला पोचले असून स्थुलातील आपत्काळ आरंभ झाला आहे’, असे जाणवले. (‘कोरोना’ विषाणूंमुळे वेगाने पसरणार्‍या साथीच्या रोगामुळे भारतात २२.३.२०२० पासून ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली. – संकलक)

३ इ. तुळशीच्या पानांतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे
औषधांमधील नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन त्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

देवासुर लढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अधर्माचा’ पक्ष (वाईट शक्ती) कितीही बलवान आणि धूर्त असला, तरी ‘धर्माचा’ पक्ष (संत आणि साधक) सत्याच्या बाजूने लढत असल्याने ईश्‍वराच्या आशीर्वादाने धर्माचाच विजय होतो. देवासुर लढ्यात ईश्‍वर भक्तांचे लीलया रक्षण करतो. या घटनेत परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहधारी अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी ईश्‍वराने जणू संतांच्या माध्यमातून ‘औषधांवर तुळशीपत्र ठेवण्याचा’ अतिशय सोपा अन् प्रभावी उपाय सांगितला. तुळशीच्या पानांतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे औषधांमधील नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन त्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यातून तुळशीचे महत्त्व लक्षात येते. तसेच ‘ईश्‍वर भक्ताचे रक्षण कसे करतो’, हेही लक्षात येते.

३ ई. ‘येणारा आपत्काळ किती भयंकर असणार आहे’, हे जाणून साधक आणि समाज यांचे
रक्षण व्हावे, यासाठी सतत प्रयत्नरत असणारे एकमेवाद्वितीय द्रष्टा ‘समष्टी संत’ परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी काही वर्षांपूर्वीच सांगितले होते – ‘पुढे काही वर्षांनी तीव्र आपत्काळास आरंभ होणार आहे. त्यातून तरून जाण्यासाठी साधना करा, ईश्‍वराप्रती भाव वाढवा, ईश्‍वराचे भक्त व्हा; कारण केवळ ईश्‍वर भक्तांचे रक्षण करतो.’ तसेच आपत्काळात वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. हे जाणून त्यांनी आपत्काळात तरून जाण्यासाठी अनेकविध सहजसोपे उपायही सांगितले आहेत. ते सनातनच्या ‘आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालेतील ग्रंथांमध्ये दिले आहेत. समाजाला साधना शिकवून आणि ग्रंथांच्या माध्यमातून आपत्काळात तरून जाण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणार्‍या प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (९.५.२०२०)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment