सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. पुढे पुढे तर ती इंधने मिळणारही नाहीत. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील. अशा वेळी प्रवास करणे, रुग्णाला वैद्याकडे नेणे, सामान आणणे इत्यादी कारणांसाठी सायकल वापरणे उपयुक्त ठरेल. ‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एकमेव साधन आहे. सायकलींच्या देखभालीसाठी (मेनटेनन्ससाठी) अन्य वाहनांच्या तुलनेत अत्यल्प व्यय येतो. ‘सायकलींची देखभाल कशी करायची ?’, हे शिकल्यास ती कुणालाही करता येते. अल्प अंतराचा प्रवास आणि थोडीफार मालवाहतूक यांसाठी सायकल वापरणे सोयीचे आहे.
१. धर्मप्रसाराच्या कार्यासाठी न्यूनतम १ सहस्र सायकलींची आवश्यकता !
‘आपत्कालीन स्थिती कधी उद्भवेल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातनच्या धर्मप्रसार कार्यासाठी सायकली उपलब्ध होणे आवश्यक आहे. एकूण साधकसंख्येचा विचार केल्यास सध्या पुरुषांसाठी वापरण्यात येणार्या ४०० आणि महिलांसाठी वापरण्यात येणार्या ६०० अशा एकूण १ सहस्र सायकलींची आवश्यकता भासणार आहे. एका सायकलचे अंदाजे मूल्य ५ सहस्र रुपये असते. १ सहस्र सायकलींच्या खरेदीसाठी ५० लक्ष रुपये व्यय येणार आहे. वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांच्याकडे सुस्थितीतील सायकल असल्यास ते ती अर्पण स्वरूपात देऊ शकतात. ‘गिअर’च्या आधुनिक प्रकारच्या सायकली असल्यास त्याही अर्पण देऊ शकता.
२. सायकलच्या सुट्या भागांचीही आवश्यकता !
सायकलसह तिचे टायर, ट्युब, हवा भरण्याचा पंप, पंक्चर काढण्याचे किट (सोल्यूशन ट्यूब, पंक्चर पॅच), ‘रिम’ (चाकाची बाहेरील गोलाकार कडा), ‘स्पोक्स’ (सायकलच्या चाकांना जोडणार्या तारा), बॉल्स, डायनामो (यांत्रिक शक्तीचे रूपांतर विद्युतशक्तीत करणारे यंत्र (सायकल गतीमान असतांना डायनामोमुळे सायकलचा दिवा आपोआप पेटतो.), दिवे, बल्ब, स्टँड, कॅरियर (साहित्य ठेवण्यासाठी आणि बसण्यासाठी सायकलच्या मागच्या चाकावर असलेली जागा), घंटी, कुलूप, फ्रंट बकेट (साहित्य ठेवण्यासाठी सायकलला पुढे लावलेली परडी) इत्यादी सुट्या भागांचीही आवश्यकता आहे.
जे सायकल विक्रेते नवीन सायकल अर्पण स्वरूपात देऊ इच्छितात, तसेच अर्पणदाते सायकलच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करू शकतात अथवा स्वतःकडे असलेली सुस्थितीतील सायकल देऊ शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा. सायकलचे सुटे भाग अर्पण करू शकत असल्यास तसेही कळवावे.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.’