आपत्कालीन स्थितीमुळे घराबाहेर पडण्यास मर्यादा येत असतांना श्रावण सोमवारी करावयाचे शिवपूजन !

 

१. श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करणे

‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।
वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ।।’

– ग्रंथ व्रत राज

अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी.

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

 

२. शिवाची पूजा कशी करावी ?

अ. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

आ. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.

इ. शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.

ई. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.’

– श्री. कौशल दामले (पुरोहित), कुडाळ, सिंधुदुर्ग.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “आपत्कालीन स्थितीमुळे घराबाहेर पडण्यास मर्यादा येत असतांना श्रावण सोमवारी करावयाचे शिवपूजन !”

  1. खूप सुंदर लेख आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ॐ नमः शिवाय ॐ

    Reply

Leave a Comment