सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचा आशीर्वाद आहे अन् देवीच हे कार्य पुढे चालवणार आहे !

गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश

 

प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामी

‘पूर्वीच्या काळी संकट आल्यावर शिष्य सद्गुरूंना शरण जायचे आणि गुरु शिष्याचे रक्षण करायचे. जेव्हा हरि-हर दोघेही कोपत असत, तेव्हा गुरु सर्वांचे रक्षण करायचे. आपण गुरूंचे गुलाम (दास) झाले पाहिजे, तरच आपल्याला मुक्ती मिळेल. पूर्वीच्या काळी गुरूंचे महत्त्व सर्वांना ठाऊक होते; मात्र या आधुनिक काळात म्हणजे कलियुगात लोकांना गुरूंचे महत्त्व ठाऊक नाही. आज सनातन संस्थेचे साधक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनुग्रहाने साधना करत आहेत. गुरु-शिष्य कसे असतात, हे प्रत्यक्ष तेथे शिकायला मिळते. गुरु हेे अंधारात असलेल्यांना प्रकाशात घेऊन जाणारे असतात. लहान असतांना आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात. नंतर शाळेत शिकवणारे शिक्षक असतात. आम्हा सर्वांना ठाऊक असेलच की, दत्तात्रेय, श्री राघवेंद्र स्वामीजी, सत्यसाईबाबा हे सर्व गुरुच होते. गुरूंमुळेच लाखो लोकांनी मोक्ष प्राप्त केला आहे. गुरूंना शरण जाऊन ते सांगतील तसे करायला हवे.

आज सनातन संस्था आणि तिच्या आश्रमात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सनातन धर्माचे, म्हणजे हिंदु धर्माचे कार्य राष्ट्रभरात पसरले आहे. हे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य उत्तम होवो अन् याला सनातन संस्थेचे आश्रम साक्षी होवोत. या सर्व कार्याला श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचा आशीर्वाद आहे आणि देवीच कार्य पुढे चालवणार आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभकार्यात देवीचा आशीर्वाद सर्वांवर आहे.’

– प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी, श्री मठ, हंगरहळ्ळी, तालुका कुणीगल, कर्नाटक. (४.७.२०२०)

Leave a Comment