उत्तरप्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यांतील वाचकांचा चांगला प्रतिसाद
वाराणसी (उत्तरप्रदेश) – कोरोना महामारीच्या या संकटकाळात भय, चिंता इत्यादी मानसिक आजारांनी लोकांच्या मनात घर केले आहे. अशा वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी आत्मबळाची आवश्यकता आहे आणि ते केवळ साधना केल्याने मिळू शकते. त्यामुळे अधिकाधिक लोकांना साधना समजावी आणि त्यांना ती करणे शक्य व्हावे, यांसाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या हिंदी भाषेतील वाचकांसाठी नियमित ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संग प्रारंभ करण्यात आले आहेत. या सत्संगांना हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारताचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन लाभले. या साधनाविषयक मार्गदर्शनाचा लाभ झारखंड राज्यातील कतरास, धनबाद, जमशेदपूर, रांची; बिहार राज्यातील समस्तीपूर, मुझफ्फरपूर, पाटलीपुत्र, वैशाली; उत्तरप्रदेशातील वाराणसी, प्रयाग, सुलतानपूर, अयोध्या, गोरखपूर, गाझीपूर आणि भदोही आदी जिल्ह्यांतील, तसेच बंगालमधील पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक नियमितपणे घेत आहेत.