गडचिरोली – अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात जोधपूर (राजस्थान) येथील सनातन संस्थेच्या साधिका डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांनी ‘भारतीय संस्कृती’ यावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि तिचे कार्य, तसेच दळणवळण बंदीच्या काळात अध्यात्मविषयक ज्ञान देणारी ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ यांविषयी माहिती दिली. या मेळाव्यात ५५ महिला सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली येथील माहेश्वरी समाजाच्या सौ. संगीता सारडा यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात गडचिरोली येथील हिंदी पाक्षिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. सुधा राठी यांनी मोलाचा सहभाग घेतला. या कार्यक्रमानंतर ‘देवाने मला माध्यम करून आयोजन करून घेतल्यामुळे कृतकृत्य वाटत आहे’, असे सौ. राठी यांनी सांगितले.