काही द्रष्टे संत, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भविष्यवेत्ते अनेक वर्षांपासून ज्या भीषण आपत्काळाविषयी सांगत होते, त्याचा आरंभ झालेला आहे. मागील ३ – ४ वर्षांत देशात झालेली पूरग्रस्त स्थिती, काही देशांतील जंगलांमध्ये वणवा पेटणे, काही ठिकाणी भूकंप होणे, त्सुनामी येणे यांसारख्या घटनांतून आपत्काळाची चाहूल लागली होती. आता संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे आपत्काळाला प्रत्यक्ष आरंभ झालेला आहे. या आपत्काळाचे स्वरूप आणि त्याचे टप्पे पुढील प्रमाणे असतील.
१. आपत्काळाचा टप्पा, त्याची तीव्रता,
त्याचा स्तर, त्याचे स्वरूप आणि त्याच्याशी संबंधित वर्ष
आपत्काळाचा टप्पा |
आपत्काळाशी संबंधित वर्ष |
आपत्काळाची तीव्रता |
आपत्काळाचा स्तर |
आपत्काळाचे स्वरूप |
१. | २०१९ – २०२० | मंद | सूक्ष्म | विविध प्रकारच्या विषाणूंमुळे संसर्गजन्य रोग होणे आणि गृहकलह होणे |
२. | २०२० – २०२१ | मध्यम | स्थूल | गृहकलह आणि विविध प्रकारच्या प्राकृतिक आपत्ती उदा.पूर, भूकंप,दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक |
३. | २०२१ – २०२२ | तीव्र | स्थूल | गृहकलह आणि विविध देशांमध्येयुद्ध होणे |
४. | २०२२ – २०२३ | सर्वांत तीव्र | स्थूल | विश्वयुद्ध ३ होणे |
२. भीषण काळात पृथ्वीवर असणार्या सात्त्विक जिवांना विविध स्तरांवर साहाय्य मिळणे
स्तर | साहाय्य करणारे घटक | साहाय्याचे प्रमाण (टक्के) |
१. शारीरिक | वैद्य, परिवार आणि सरकार (राज्यकर्ते) | ५ |
२. मानसिक | परिवार, मित्र आणि मानसोपचार तज्ञ | १० |
३. आर्थिक | सरकार, उद्योगपती आणि विविध सामाजिक संघटना | १५ |
४. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक |
विविध देवता, ऋषिमुनी, संत, सद्गुरु, परात्पर गुरु आणि ईश्वर (टीप) | ७० |
टीप : ईश्वर थेट साहाय्य न करता तो कोणाच्या तरी माध्यमातून साहाय्य करील. ‘व्यक्ती आणि निसर्ग यांच्या माध्यमातून साक्षात् भगवंत साहाय्य करत आहे’, याची जाणीव केवळ भाव असणारे साधक आणि संत यांनाच होईल.
३. भीषण आपत्काळाची व्याप्ती
हा भीषण आपत्काळ केवळ पृथ्वीवरच नसून ब्रह्मांडातील विविध ग्रहांवर आणि सप्तलोकांतील काही लोकांवरही असेल. त्यामुळे ब्रह्मांडातील विविध ग्रह आणि लोक यांवर रहाणार्या विविध सात्त्विक जिवांचे रक्षण भगवंत विविध प्रकारे करणार आहे; कारण सत्त्वप्रधान जिवांची ओढ मायेकडे नसून भगवंताकडे असते. त्यामुळे भगवंत त्यांचा संपूर्ण भार वाहतो.
४. धर्माचरण आणि साधना करणार्या सात्त्विक जिवांना विविध सात्त्विक
घटकांचे साहाय्य अन् संरक्षण प्राप्त होऊन त्यांचे घोर आपत्काळातही रक्षण होणार असणे
ईश्वर अनंत कोटी ब्रह्मांडनायक असल्याने त्याचे सर्वांत उत्कृष्ट व्यवस्थापन आहे. त्यामुळे त्याचा या गुणाची प्रचीती ईश्वराचे सगुण-निर्गुण रूप असणार्या देवदेवता, ऋषिमुनी, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्या माध्यमातून सात्त्विक जिवांना येणार आहे. त्याचप्रमाणे कठोर धर्माचरण आणि चांगली साधना करणार्या राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी राज्यकर्त्यांमध्येही ईश्वराचा ‘उत्कृष्ट व्यवस्थापन करणे’, हा दैवी गुण प्रजेला अनुभवण्यास मिळेल. त्यामुळे धर्माचरण आणि साधना करणार्या सात्त्विक जिवांचे घोर आपत्काळातही रक्षण होणार आहे.
ईश्वराच्या विविध रूपांकडून विविध स्तरांवरील साहाय्य मिळण्यासाठी सर्वांनी आजपासून नव्हे, तर या क्षणापासून साधनेला आरंभ करावा आणि जे आधीपासून साधना करत आहेत, त्यांनी स्वत:ची साधना गुणात्मकदृष्ट्या वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करावेत.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी विविध स्तरांवर आतापासूनच सिद्धता करा !