श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. हे व्रत करण्यामागील शास्त्र आणि या व्रताचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.
तिथी : भाद्रपद शुद्ध तृतीया
१. इतिहास आणि उद्देश
पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.
२. व्रत करण्याची पद्धत
प्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसर्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात.
३. हरितालिकेच्या पूजनाच्या वेळी
सोळा प्रकारची पत्री शिवपिंडीवर वाहणे
अ. हरितालिका पूजनाच्या वेळी वाहण्यात येणार्या १६ पत्रींची नावे,
त्यांच्याशी संबंधित नाममंत्र आणि त्या वेळी प्रक्षेपित होणारी देवतांची स्पंदने
पत्रींची नावे | नाममंत्र | प्रक्षेपित होणारी देवतांची स्पंदने | |
---|---|---|---|
१. | बिल्वपत्र | श्री उमायै नमः । | शिवतत्त्व + शक्ती |
२. | आघाडा | श्री गौर्ये नमः । | गणपति + शक्ती |
३. | मालती | श्री पार्वत्यै नमः । | शिव + शक्ती |
४. | दूर्वा | श्री दुर्गायै नमः । | गणपति + शक्ती |
५. | चंपक | श्री काल्यै नमः । | महाकाली |
६. | करवीर | श्री भवान्यै नमः । | शक्ती |
७. | बदरी | श्री रुद्राण्यै नमः । | शिव + शक्ती |
८. | रुई | श्री शर्वाण्यै नमः । | हनुमान + शक्ती |
९. | तुळस | श्री चंडिकायै नमः । | विष्णु + शक्ती |
१०. | मुनिपत्र | श्री ईश्वर्यै नमः । | निर्गुण |
११. | दाडिमी | श्री शिवायै नमः । | शिव + शक्ती |
१२. | धोतरा | श्री अपर्णायै नमः । | शिव + शक्ती |
१३. | जाई | श्री धात्र्यै नमः । | शक्ती |
१४. | मुरुबक | श्री मृडान्यै नमः । | महाकाली |
१५. | बकुळ | श्री गिरिजायै नमः । | गणपति + शक्ती |
१६. | अशोक | श्री अंबिकायै नमः । | ब्रह्म + शक्ती |
वरील सारणीतील प्रक्षेपित होणारी स्पंदने मूळ शिवस्वरूप तत्त्व आणि त्याची शक्ती यांच्या संदर्भातील आहेत.’
– कु. प्रियांका
आ. शिवपिंडीवर १६ पत्री वाहतांना सूक्ष्मातून घडणारी प्रक्रिया
आकृष्ट होणारी तत्त्वे
भावपूर्ण पद्धतीने १६ प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्त्व, शिवतत्त्वात्मक प्रवाह आकृष्ट होणे
निर्माण होणारी तत्त्वे
शिवपिंडीमध्ये परमेश्वरी तत्त्वाचे वलय, शिवतत्त्वात्मक वलय, शिवपिंडीभोवती निर्गुण तत्त्वाचे वलय निर्माण होऊन कार्यरत स्वरूपात फिरणे
४. आदिशक्ती
अ. आदिशक्तीचा (शिवस्वरूप शक्तीचा) प्रवाह आकृष्ट होणे
१६ शक्तीस्वरूप नाममंत्रांचे पठण करत १६ पत्री शिवपिंडीवर वाहतात. त्यामुळे शिवपिंडीत शिवस्वरूप शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो.
आ. अप्रकट आदिशक्तीचे वलय निर्माण होणे
येथे शिवपिंडीच्या पूजनातून शिव आणि त्याची शक्ती (पार्वती) यांतून पिंडीत आदिशक्तीची निर्मिती होते. मंत्रांसह पत्री अर्पण करत भावपूर्ण पूजन केल्याने प्रत्येक पत्रीतून वेगवेगळ्या तत्त्वाची निर्मिती होते. कालांतराने आदिशक्ती या निर्गुण तत्त्वातून महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीनही तत्त्वांची निर्मिती होऊन या शक्ती हरितालिका पूजनातून स्त्रीला प्राप्त होतात.
५. शक्ती
शिवपिंडीत निर्माण झालेल्या शक्तीतून शिवलिंगाभोवती शक्ती कार्यरत होणे आणि शक्तीच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे
शिवस्वरूप शक्तीचे कण वातावरणात पसरणे
पत्रीपूजनातून अधिक प्रमाणात शक्तीची स्पंदने निर्माण होतात. शिवपिंडीत शक्तीची निर्मिती झाल्याने तिला देवत्व प्राप्त होते. त्यामुळे शिवपिंडीभोवती निर्गुण तत्त्वाचे वलय कार्यरत स्वरूपात फिरते.’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (श्रावण कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५१११ (७.८.२००९))
खूप छान माहिती मिळाली आहे
हा खूप छान माहिती मिळाले
hartalika Puja eka thikhani Keli dusrya thikani sodvle tar chalte ka
नमस्कार किशोर जी,
असे करता येणार नाही.
आपली,
सनातन संस्था
Khup chaan mahiti