‘प.पू. डॉक्टरांनी सतत ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर काय जाणवते ?, यापेक्षा सूक्ष्मातून काय जाणवते, ते महत्त्वाचे’, असे प्रतिपादन केले. अनेक साधकांना त्यांच्या प्रेरणेने आणि कृपेने सूक्ष्म स्तरावरील घडामोडी समजू लागल्या. याला त्यांनी प्रसिद्धी दिली. यातून समाजाला हिंदु धर्मातील धार्मिक विधींकडे पहाण्याची एक नवी दृष्टी मिळाली. यामुळे ‘धार्मिक विधी गांभीर्याने तसेच का करावेत ?’, हे समाजासमोर आले. या आधी धार्मिक विधींचा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन इतक्या विस्ताराने अभ्यास कुणी मांडला नाही.’
– डॉ. दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०१६)
विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे आध्यात्मिक संशोधन !
सूक्ष्मातले जाणणारे उच्च पातळीचे संत प्रत्येक घटकातील स्पंदने अचूक ओळखू शकतात आणि त्यांनी सांगितलेले ज्ञान ‘प्रमाण’ही असते; मात्र आजकाल आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध केलेले ज्ञानच अनेकांना विश्वासार्ह वाटते. त्यामुळे परात्पर गुरुदेवांनी आध्यात्मिक संशोधन करतांना ‘यू.टी.एस्.’ (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर), पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी), ‘थर्मल इमेजिंग’ इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधनात्मक प्रयोग करवून घेतले आहेत.
पुरुषांनी धोतर-अंगरखा (सदरा) आणि स्त्रियांनी साडी परिधान करण्यासारखे हिंदु धर्मातील आचार, नमस्कार करण्यासारख्या धार्मिक कृती, दीपप्रज्वलनासारख्या सामाजिक कृती आदींमुळे व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर कोणते चांगले परिणाम होतात ? यज्ञ, मंत्रपठण आदींतून चैतन्याची प्राप्ती कशी होते ? इत्यादींविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक उपकरणांद्वारे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले आहे.