‘संत चोखामेळा १३ व्या शतकात होऊन गेले. त्या वेळी त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. ते मागासवर्गीय असल्याने त्या वेळी श्री विठ्ठल मंदिर त्यांच्यासाठी खुले नव्हते. त्यासाठी संत चोखामेळा यांनी आंदोलन केले नाही; मात्र विठ्ठल भक्तीत त्यांचे नाव अमर राहिले. संत चोखामेळा यांनी एका अभंगात ‘उंबरठ्याशी कैसे शिवू । आम्ही जातीहीन ॥’ असे म्हटले आहे; म्हणून लोकांनी त्यांना डावलले नाही, तर त्यांचा अग्नीसंस्कार संत नामदेव यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरासमोर केला. आजही संत चोखामेळा यांची समाधी श्री विठ्ठल मंदिरासमोर आहे.’
– समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर, पुणे