मॉस्को (रशिया) – रशियाने महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती केली आहे. हा बॉम्ब आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘स्किफ’ला जोडण्यात येणार आहे. ‘स्किफ’ क्षेपणास्त्र ६ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करू शकते. ते ६० मैल प्रतिघंटा या वेगाने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. ‘रशियाच्या बचावासाठी हा बॉम्ब अंतिम पर्याय असणार आहे’, असे रशियाने म्हटले आहे. ‘या बॉम्बचा ‘रिमोट’द्वारेही स्फोट करता येऊ शकतो’, असेही सांगितले जात आहे.
१. हा बॉम्ब समुद्रातील मोठा भाग आणि त्याचा किनाराही उद्ध्वस्त करू शकतो. या बॉम्बचा वापर केल्यास ब्रिटन आणि अमेरिका यांच्या किनारपट्टीची हानी होईल आणि अनेक वर्षे तेथील पाणी विषारी होऊ शकते.
२. २५ मीटर लांब आणि १०० टन वजनाचा हा बॉम्ब समुद्रात ३ सहस्र फूट खोल अनेक वर्षे राहू शकतो. युद्धजन्य परिस्थितीमध्ये ग्रीनलँड, आइसलँड किंवा यू.के. येथे हा बॉम्ब तैनात करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
३. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी पॉल शल्ट म्हणाले, ‘‘स्किफ’ क्षेपणास्त्र महासंहारक आहे. यातून ‘रशियाला कुणीही पराभूत करू शकणार नाही’, असा संदेश द्यायचा आहे.’’