आपत्काळाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप

१. आपत्काळाचा अर्थ ? आपत्ती म्हणजे काय ?

१ अ. आपत् + काल = आपत्काल

संस्कृतमध्ये ‘आपत्’ चा अर्थ आहे, ‘संकट’; म्हणून ‘आपत्काळ’चा अर्थ ‘संकटकाळ’ असा होतो. याला आपत्तीसुद्धा म्हणू शकतो. आपत्तीला इंग्रजी शब्द ‘Disaster’ फ्रेेंंच भाषेत शब्द जो ‘Desastre’ यावरून आला आहे. हे दोन शब्द ‘Des’ आणि ‘Astre’ यांनी बनले असून याचा अर्थ ‘खराब तारा’ (विपरीत ग्रहदशा) असा आहे. आपत्ती ‘संतुलन’ बिघडवून टाकते. आपत्ती आंतरिक आणि बाह्य कारणाच्या प्रभावाने उत्पन्न होते. आपत्ती ही नैसर्गिक किंवा मानव निर्मित कारणांचा परिणाम आहे. आपत्ती जीवित आणि वित्त यांची भयानक हानी करते. अकस्मात कोसळलेली आपत्ती सामान्य जनजीवन एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त करते की, तिचा सामना करण्यासाठी उपलब्ध सामाजिक आणि आर्थिक संरक्षण कार्यव्यवस्था अपुर्‍या पडतात.

 

२. आपत्तींचे वर्गीकरण

उत्पत्तीनुसार आपत्ती या नैसर्गिक आणि मानव निर्मित असतात.

२ अ. नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्तींना पुढील विभिन्न प्रकारांच्या रूपाने पहाता येईल.

१. वायूजन्य आपत्ती : वादळ, चक्रीवादळ, चक्रीवात

२. जलजन्य आपत्ती : पूर, ढगफुटी, दुष्काळ, सुुनामी

३. पृथ्वीजन्य आपत्ती : भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, हिमस्खलन

४. संसर्गजन्य रोग : प्लेग, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया इत्यादी

यामध्ये कित्येक वेळा एका आपत्तीमुळे दुसर्‍या आपत्तीलाही आरंभ होतो. उदा. सागरतळात भूकंप झाल्यामुळेे सुनामी येण्याची शक्यता असते आणि सुनामी किंवा महापूर येऊन गेल्यानंतर संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता असते. नैसर्गिक आपत्तींमध्ये मानवनिर्मित कारणांमुळे होणार्‍या संहाराचे प्रमाण अधिक असते.

२ आ. मानवनिर्मित आपत्ती

मानवनिर्मित आपत्तीच्या अंतर्गत पुढील दुर्घटना मोडतात

१. औद्योगिक दुर्घटना

२. पर्यावरणीय र्‍हास

३. विभिन्न युध्द, तसेच आतंकवादी कारवाया करणे

४. जैविक युद्धासाठी अनुकूल वातावरणात विविध जिवाणू आणि विषाणू यांच्यासह घातक कीटकांचे संवर्धन करून त्यांना शत्रूच्या छावणींवर सोडून दिले जाते. त्यामुळे शेवटी त्या क्षेत्रात ते कीटाणू पसरून परिसरात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होता.

५. रासायनिक युद्धाच्या अंतर्गत विषारी वायू (गॅस) किंवा बाँब शत्रूच्या छावणीवर फेकले जातात.

६. मोठ्या आस्थापनातील यंत्रांच्या हाताळणी संदर्भात निष्काळजीपणा किंवा यंत्रे (दोषपूर्ण) दुःस्थितीत ठेवल्यामुळे होणार्‍या आपत्ती. यांना पर्यावरणीय त्रासदायक दुर्घटनासुद्धा म्हटले जाते. उदा. भोपाळ गॅस दुर्घटना, चेर्नोबिल परमाणू दुर्घटना, फुकुशिमा परमाणू इत्यादी घटनांचा यात समावेश होतो.

७. जंगलात लागलेली आग किंवा शहरात लागलेली आग

८. विमान दुर्घटना, रस्त्यावर होणार्‍या दुर्घटना आणि रेल्वे दुर्घटना

 

३. आपत्काळामुळे होणारी मोठी हानी

आपत्काळात होणार्‍या हानीची कल्पना येण्यासाठी काही उदाहरणे आपण पाहू या.

३ अ. वर्ष २००४ मध्ये हिंदी महासागरात ९.३ रिश्टर परिमाणाचा तीव्र भूकंप झाला होता. हा आजपर्यंतच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा भूकंप होता. या भूकंपामुळे आलेल्या सुनामीमुळे २ लाख २९ सहस्र लोक मृत्यूमुखी पडले.

३ आ. वर्ष १९५७ च्या ‘एशियन फ्लू’ च्या विश्‍व संसर्गामुळे विश्‍वभरातील १० लक्ष लोक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे.

३ इ. वर्ष १९३१ मध्ये ‘हुआंग हे’ (पिवळी नदी)मध्ये आलेल्या महापूरामुळे ४ लाख २२ सहस्रपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.

३ ई. वर्ष १९१८ च्या ‘स्पॅनिश फ्लू’च्या विश्‍व संसर्गामुळे विश्‍वभरातील ५ कोटी लोक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे.

३ उ. वर्ष १९०० मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे भारतात २ लाख ५० सहस्र तेे ३ लाख २५ सहस्र लोकांचा मृत्यू झाला.

 

४ महायुद्धाच्या काळात स्थिती काय असते ?

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांतच १३ लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले. युद्धकाळात प्रकाशबंदीही चालू झाली. बाहेर रस्त्यावर अगदी मिट्ट काळोख असायचा. खिडकीतून वा दारातून अंधुकसा प्रकाशसुद्धा बाहेर आला, तरी दंड व्हायचा ! इतकी कडक प्रकाशबंदी एक-दोन दिवस किंवा मास (महिने) नाही, तर तब्बल पाच वर्षे होती ! दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीने रशियालाही कोंडीत पकडले होते. त्या आपत्काळात रशियन जनतेवर झाडपाला, लाकडाच्या भुशाचे केक असे पदार्थ खाऊन पोट भरण्याची पाळी आली होती !

 

आज भारत तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा !

जिहादी आतंकवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चालू आहे. पाकने स्वतःची युद्धसज्जता गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढवली आहे. चीनने तर भारताला गिळंकृत करण्यासाठी सीमाभागात रस्त्यांचे जाळेही विणले आहे. एवढे उघडपणे समोर घडत असतांनाही भारताने या शत्रूराष्ट्रांविषयी अद्याप कोणतेही ठोस धोरण स्वीकारलेले नाही.

थोडक्यात युद्ध अटळ आहे. हे युद्ध काय केवळ दोन राष्ट्रांमधील असेल ? आज जग एवढे लहान झाले आहे की, पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धाला उभा राहिला, तर जगभरातील मुसलमान राष्ट्रे पाकच्या खांद्याला खांदा लावून उभी रहातील.

Leave a Comment