देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश या राज्यांतील सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा फेब्रुवारी २०२० मधील आढावा

१. शाळेतील पालक आणि शिक्षक यांच्या बैठकीच्या
वेळी ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन

‘१५.२.२०२० या दिवशी संस्कार कॉन्व्हेेंंट स्कूल, नांगलोईमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. शाळेमध्ये पालक आणि शिक्षक यांची बैठक आयोजित केली होती. त्या निमित्ताने हा वितरण कक्ष लावला होता. ‘संस्कार कॉन्व्हेंट स्कूल’चे अध्यक्ष श्री. महेश सैनी यांनी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांचे प्रदर्शन लावण्यासाठी सनातन संस्थेला आमंत्रित केले होते.

पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला आणि ‘आपल्या पाल्यांमध्ये सुसंस्कार वृद्धीसाठी प्रयत्न करू’, असे सांगितले. मुलांमध्ये सुसंस्कार वाढवण्याच्या उद्देशाने सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची विशेष मागणी होती.

 

२. महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आलेला अध्यात्मप्रसार

२ अ. ग्रंथप्रदर्शन

देहली येथे ३ ठिकाणी, नोएडा (पश्‍चिम उत्तरप्रदेश) येथे ३ ठिकाणी, फरीदाबादमध्ये ४ ठिकाणी आणि मथुरेत एका ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

२ आ. प्रवचने

देहली, फरीदाबाद आणि मथुरा येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.’

– कु. मनीषा माहूर, सनातन संस्था, देहली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment