कृत्रिम शीतपेयांचे दुष्परिणाम

Article also available in :

 

१.हाडे दुर्बल होणे

कृत्रिम शीतपेयांची ‘पी एच’ सामान्यतः ३.४ असते. त्यामुळे दात आणि हाडे दुर्बल बनतात. मानवी आयुष्याची जवळजवळ ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या शरिरात हाडांच्या निर्मितीची प्रक्रिया बंद होते. त्यानंतर खाद्यपदार्थांमधील आम्लतेच्या प्रमाणानुसार हाडे दुर्बल होण्यास प्रारंभ होतो.

 

२. शरिराचे तापमान आणि पेय पदार्थांचे तापमान
यामधील विषमतेमुळे व्यक्तीच्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम होणे

स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहिले, तर या पेयपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे किंवा खनिज तत्त्वांचा मागमूसही नसतो. यात साखर, कार्बोलिक आम्ल, तसेच इतर रसायनांचाच भाग असतो. आपल्या शरिराचे सामान्य तापमान ३७ अंश (डिग्री) तापांश (सेल्सिअस) असते, तर एखाद्या शीतपेय पदार्थाचे तापमान यापेक्षाही अतिशय न्यून, म्हणजेच शून्य अंश (डिग्री) तापांश (सेल्सिअस) पर्यंतही असते. शरिराचे तापमान आणि पेय पदार्थांचे तापमान यांमधील विषमता व्यक्तीच्या पचनशक्तीवर विपरीत प्रभाव टाकते. परिणामी व्यक्तीने खाल्लेल्या भोजनाचे अपचन होते. त्यामुळे वायू आणि दुर्गंध निर्माण होऊन दातांमध्ये पसरतो अन् अनेक रोगांचा जन्म होेेतो.’

 

३. प्रयोगातील निष्कर्ष

‘एका प्रयोगात एका तुटलेल्या दाताला अशाच एका पेयाच्या कुपीत टाकून बंद करण्यात आले. १० दिवसांनंतर तो दात निरीक्षणासाठी काढायचा होता; परंतु तेव्हा तो दात आत नव्हताच, म्हणजेच त्यात विरघळून गेला होता. लक्षात घ्या, इतके मजबूत दातही हानीकारक पेय पदार्थांच्या दुष्प्रभावामुळे विरघळून नष्ट होतात, तर हे पदार्थ पचनासाठी अनेक घंटे जिथे पडून असतात, त्या कोमल तसेच नाजूक आतड्याचे काय हाल होत असतील ?’

 

४. मुलांचा स्वभाव हिंस्र आणि आक्रमक होणे

‘दिवसातून शीतपेयांच्या ४-५ बाटल्या पिणार्‍या मुलांपैकी १५ टक्के मुलांचा स्वभाव हिंस्र आणि आक्रमक होतो !’

(संदर्भ : आधुनिक वैद्य (डॉ.) प्रकाश प्रभू, एम्.डी., हिन्दवी, ११.४.२०१० आणि दै. सामना, २७.३.२०१२)

Leave a Comment