मुंबई – मुलुंड पूर्व येथील नानेपाडा श्री शिवगणेश मंदिरात ७ मार्च या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी उपस्थित जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा ७५ जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी साधनेविषयी मार्गदर्शन करणारे फ्लेक्स प्रदर्शन, तसेच सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचाही जिज्ञासूंनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे श्री. राजेंद्रप्रसाद भोगले यांनी केले. या प्रवचनाला नानेपाडा श्री शिवगणेश मंदिराचे अध्यक्ष श्री. मधुकर म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मुलुंड येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
- नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
- हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !
- श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन...
- सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
- कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !