चेन्नई येथे अट्टुकल पोंगलनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

चेन्नई –‘सत्संगम’ या आध्यात्मिक संस्थेने ९ मार्च २०२० या दिवशी चेन्नईच्या मीनाबक्कम् येथील ए.एम्. जैन महाविद्यालयाच्या पटांगणावर अट्टुकल पोंगलचे आयोजन केले होते. या  प्रसंगी १ सहस्रपेक्षा अधिक महिलांनी भक्तीभावाने पोंगलचे व्रत ठेवले होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. अनेक जिज्ञासूंनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला. या वेळी ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत सनातन संस्थेच्या सौ. गौरी व्यंकटेशन्, सौ. कल्पना बालाजी, श्री. बालाजे कोले, श्री. प्रभाकरन् आणि सौ. सुगंधी जयकुमार सहभागी झाल्या होत्या.

 

भाजपचे सरचिटणीस जयप्रदीप यांची ग्रंथप्रदर्शनाला भेट

भाजपचे सरचिटणीस आणि वेलाचेरी दक्षिण-पश्‍चिम विभागाचे प्रभारी श्री. जयप्रदीप यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. राजकारणात कार्यरत असूनही ते युवकांसाठी ‘वन ड्रॉप ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी’ या नावाखाली नियमित व्याख्यान आयोजित करतात. युवकांना आध्यात्मिक लाभ व्हावा, या उद्देशाने ते हे सर्व करत असतात. सनातन संस्थेची ग्रंथसंपदा पाहून ते भारावून गेले. सनातन संस्थेच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्याची त्यांनी विनंती केली. ते ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment