- खडकवासला आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी घेतला सहभाग
- धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी केलेल्या प्रबोधनातून नागरिकांमध्ये जागृती
पुणे – हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने मागील १८ वर्षांपासून राबवण्यात येणार्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानाला या वर्षीही कृतीशील प्रतिसाद मिळाला. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी नागरिकांचे प्रबोधन केल्यामुळे त्यांच्यात पुष्कळ जागृती झाली. अनेकांनी अभियानाचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले. अभियानात विविध माध्यमांतून सहभागी होण्याची सिद्धता दाखवली. सकाळी ९ वाजता प्रारंभ झालेले हे अभियान सायंकाळी ७ पर्यंत चालू होते. यंदाच्या वर्षी खडकवासला आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, तसेच हवेली आणि ग्रामीण पोलीस, प्रशासन यांचाही सहभाग लाभला. अभियानस्थळी उपस्थित असलेल्या अनेक पोलिसांनी अभियानाचे कौतुक केले. सर्व प्रतिसादामुळे अभियानस्थळाच्या ठिकाणी असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला. उपस्थित मान्यवरांनी अभियानाविषयी आपले मत व्यक्त केले.