- याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, बुद्धीजीवी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना काय म्हणायचे आहे ?
- ‘संगीताद्वारेही उपचार करता येऊ शकतात’, असे हिंदूंच्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेे आहे. असे असतांना त्यांना थोतांड म्हणणारे अथवा त्यांच्यावर टीका करणारे आतातरी संगीताचे उपचार मान्य करतील का ? ब्रिटीश विद्यापिठाच्या या संशोधनाने हिंदूंच्या धर्मशास्त्रांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते !
लंडन – स्ट्रोक (आघात) आलेले रुग्ण, तसेच शारीरिक आणि मानसिक रोग यांवर संगीत उपचारपद्धत (म्युझिक थेरपी) उपयुक्त ठरू शकते. याचसमवेत वेदना न्यून करणे, तसेच एखाद्या दुर्धर आजारावर मात करतांना मनाची स्थिती चांगली रहावी किंवा एकाग्रतेत वाढ व्हावी, यासाठी संगीत उपचारांचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे संशोधन ब्रिटनमधील ‘अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी’ने केले आहे.
१. या अभ्यासासाठी संशोधकांनी १७७ रुग्णांची निवड केली होती. हे रुग्ण २ वर्षांच्या कालावधीत ६७५ संगीत उपचार सत्रांमध्ये सहभागी झाले होते. या सत्रांमध्ये ड्रम, गिटार यांसह अनेक वाद्यांचा समावेश होता.
२. या सत्रांमध्ये फिजिओथेरपी, व्यावसायिक उपचारपद्धत (ऑक्युपेशनल थेरपी), वाचा उपचारपद्धत (स्पीच थेरपी) आणि मानसशास्त्र चिकित्सा (क्लिनिकल सायकोलॉजी) या क्षेत्रांतील तज्ञांचेही साहाय्य घेण्यात आले.
३. ‘रुग्णांच्या मानसिक स्थितीमध्ये सुधारणा पहायला मिळण्यासह त्यांच्या उदासीनतेचे प्रमाणही न्यून झाले आणि उत्साह वाढला आहे’, असे संशोधनातून स्पष्ट झाले. त्यामुळे ‘कुठल्याही आजारावर संगीत उपचार पद्धत उपयुक्त ठरू शकते’, असे संशोधकांचे म्हणणे आहे.