सनातनच्या आश्रमात संपन्न झाला शतचंडी याग !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात येणारे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर करण्यासाठी, तसेच येणार्या हिंदु राष्ट्रात सुख-समृद्धी नांदण्यासाठी हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील भूलोकावरील शिवक्षेत्री म्हणजेच सनातनच्या आश्रमात २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शतचंडी याग देवीच्याच उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी श्री मठाचे प.पू. श्री श्री श्री बालमंजुनाथ महास्वामीजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
सूर्याप्रमाणे तेजाने तळपणार्या, चंद्रासमान शीतलतेने भक्तांना अभय देणार्या, तारणहारी, संकटनिवारिणी श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे आगमन आणि शतचंडी याग आदी सोहळा हा केवळ नि केवळ देवीच्या चैतन्याने झळाळला अन् तिने साधकांना दर्शन देत भरभरून कृपावर्षाव केला. शतचंडी यागाच्या निमित्ताने श्री गणपतिपूजन, पुण्याहवाचन, देवता आवाहन आदी विविध विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले.