पवित्र गंगेत डुबकी मारण्याचे शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ मोठे ! – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्‍होड्स

गंगानदीला ‘गटार’ किंवा ‘प्रदूषित’ म्हणणारे तथाकथित पुरो(अधो)गामी आणि बुद्धीजीवी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

ऋषिकेश – क्रिकेट क्षेत्रात ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू’ असा बहुमान मिळवलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी र्‍होड्स यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून नमस्काराच्या मुद्रेत गंगास्नान करतांनाचे छायाचित्र प्रसारित केले आहे. या छायाचित्राखाली त्यांनी ‘पवित्र गंगेच्या थंडगार पाण्यात डुबकी मारण्याचे शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ मोठे आहेत’, असे लिहिले आहे. या ट्वीटच्या वेळी र्‍होड्स यांनी ‘मोक्ष’, ‘ऋषिकेश’ आणि ‘इंटरनॅशनल योग फेस्टिव्हल’ या शब्दांना ‘हॅशटॅग’ (ट्विटरवर एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) केले आहे.


र्‍होड्स यांच्यावर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यांनी वर्ष २०१६ मध्ये जन्मलेल्या त्यांच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि वारसा यांविषयी ते नेहमीच कौतुकाने बोलत असतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment