चेन्नई – मिलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. नृत्य शिक्षिका सौ. गीता गणेश (पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या वहिनी) यांच्या पुढाकाराने प्रदर्शन कक्ष उभारण्यात आला होता. सौ. गीता गणेश यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाविषयी माहिती सांगितली. तसेच प्रदर्शनातील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अनेक पालकांनी नंतर प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने विकत घेतली. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत सहभागी झाल्या होत्या.
तमिळनाडूच्या कला आणि संस्कृती मंत्र्यांची ग्रंथप्रदर्शनाला भेट
या वेळी आर्.आर्. सभा संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका आध्यात्मिक कार्यक्रमाला तमिळनाडू राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री के. पंडियाराजन् उपस्थित होते. त्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे कार्य आणि सनातन संस्थेच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये यांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. त्यांनी तमिळ भाषेतील ग्रंथ विकत घेतले.