लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांत विविध ठिकाणी अध्यात्मप्रसारानिमित्त ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. याचा सहस्रो जिज्ञासूंनी लाभ घेतला.
बिहार – मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गरीब नाथ मंदिर, हाजीपूर येथील श्री यंत्र मंदिराच्या राजेंद्र चौकात, पाटलीपुत्र येथील हनुमाननगर, कंकडबाग येथील शिव शक्ती मंदिर, तसेच समस्तीपूर येथील श्री थनेश्वर मंदिर अशा विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याचा सहस्रो जिज्ञासूंनी लाभ घेतला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे पृथ्वीवर
सनातन धर्म टिकून आहे ! – एका जिज्ञासूचे भावपूर्ण उद्गार
मुझफ्फरपूर (बिहार) येथील ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी एक जिज्ञासू आले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेल्या ‘परात्पर गुरु आठवलेजी के ओजस्वी विचार’ या हिंदी ग्रंथाला परत परत स्पर्श करून म्हणाले, ‘‘या संतांमुळेच पृथ्वीवर सनातन धर्म टिकून आहे.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पहातांना त्यांच्या डोळ्यांत भाव प्रकट होत होता. ते म्हणाले, ‘‘मी पूजा करून परत येतांना हा ग्रंथ घेऊन जाईन.’’ मात्र थोड्या वेळाने ते अर्ध्या रस्त्यातून परत आले आणि म्हणाले, ‘‘कदाचित् आपण येथून निघून जाल आणि मला ग्रंथ मिळणार नाही, असे तर होणार नाही ना ? मी आधी ग्रंथ घेतो. मग पूजा करायला जातो.’’ त्यानंतर त्यांनी ‘हिन्दु राष्ट्र स्थापना की दिशा’ हा हिंदी ग्रंथ खरेदी केला आणि देवतांच्या नामजपाच्या पट्टयाही खरेदी केल्या. जातांना ते म्हणाले, ‘‘तुमचे कार्य अद्भुत आहे, माझ्याजवळ यासाठी शब्द नाहीत.’’
उत्तरप्रदेश – उत्तरप्रदेशातील अयोध्या, कानपूर, लक्ष्मणपुरी, भदोही, गाजीपूर आणि वाराणसी या जिल्ह्यांमध्ये ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे एकूण ११ ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आले. यासमवेत धर्मशिक्षण देणार्या फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले. याचा सहस्रो जिज्ञासूंनी लाभ घेतला.