देहली – २१ फेब्रवारी २०२० या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून देहली, देहली शहर आणि उत्तरप्रदेशातील काही शहरांमध्ये ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच काही ठिकाणी प्रवचने घेण्यात आली.
१. देहली येथील मालवीय नगरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळी १० दुपारी ३ या वेळेत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.
२. ग्रेटर कैलाश भागातील सनातन धर्म मंदिरात सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. जवळजवळ ७० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
३. कॅनॉट प्लेस भागातील बाबा खडगसिंह मार्गावरील प्राचीन शिवमंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. तसेच मंदिरातील पुजार्यांनी ग्रंथप्रदशर्र्नाविषयी चांगला अभिप्राय दिला.
४. अलकनंदा येथील संतोषी माता मंदिरात प्रवचन आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या साधिका कु. पूर्णिमा शर्मा आणि श्रीमती मंजुला कपूर यांनी हे प्रवचन घेतले. या प्रवचनातून भगवान शिव या देवतेची उपासना आणि शिवरात्र या विषयीची माहिती देण्यात आली.
५. गाजियाबाद (उत्तरप्रदेश) येथील विजयनगरमधील श्री दुधेश्वर मंदिरात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. अनेक भाविकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
६. ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) पश्चिम या ठिकाणी असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या प्रांगणात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. जवळजवळ १२० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
७. न्यू कोंडली येथील शिवशक्ती मंदिरात प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
राजस्थानमधील भादरा येथे महाशिवरात्रीनिमित्त ग्रंथप्रदर्शन
भादरा (राजस्थान) – येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. अनेक जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. तसेच येथील पू. प्रबलजी महाराज यांच्या आश्रमात १६ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत गुणप्रकाशजी महाराज यांच्याद्वारे श्रीकृष्ण चरित्र कथा आणि महारुद्र यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळीही ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचा अनेक भक्तगणांनी लाभ घेतला. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी अखिल भारतवर्षीय धर्मसंघ, तसेच करपात्री फाऊंडेशनचे उत्तराधिकारी प.पू. डॉ. गुणप्रकाश महाराज यांना जून २०२० मध्ये गोवा येथे होणार्या नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने तेलंगणमध्ये महाशिवरात्रीनिमित्त धर्मप्रसार
भाग्यनगर (तेलंगण) – सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त तेलंगण राज्याच्या विविध भागांमध्ये धर्मप्रसार करण्यात आला. तेलंगणातील भाग्यनगर, इंदूर, भोदन आणि विशाखापट्टणम् येथे सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच करीमनगरमध्ये ४ ठिकाणी फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. इंदूर येथील प्रदर्शन कक्षाला जिल्हाधिकारी अधिनारायण रेड्डी यांनी भेट दिली.