वैज्ञानिकांचे संशोधन
नवी देहली – ऑस्ट्रिया वंशाचे अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ आणि दार्शनिक फ्रिटजॉफ कॅपरा यांनी भगवान शिवाच्या नटराज रूपातील तांडव नृत्याचे परमाणूची उत्पत्ती आणि विनाश यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे. कॅपरा यांच्या वर्ष १९७२ मध्ये प्रकाशित ‘मॅन करेंट्स ऑफ मॉडर्न थॉट’ या पुस्तकातील ‘द डान्स ऑफ शिव’ या लेखामध्ये त्यांनी याविषयी लिहिले आहे. त्यांनी ८ जून २००४ मध्ये जिनेव्हा येथील ‘युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’मध्ये तांडव नृत्य करणार्या नटराजच्या उंच मूर्तीचे अनावरण केले होते.
१. शिवाच्या तांडवमधील विज्ञान
शिवाच्या नृत्याची २ रूपे आहेत. एक आहे लास्य. ज्याला नृत्यामध्ये कोमल रूप म्हटले जाते. दुसरे आहे तांडव, जो विनाश दर्शवतो. भगवान शिवाचे नृत्य सर्जन आणि विनाश दर्शवतो. तांडव नृत्य ब्रह्मांडामधील मूल कणांच्या वर-खाली होण्याच्या प्रक्रियेचे दर्शक आहे. तांडव करणार्या नटराजाच्या पाठीमागील चक्र ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. त्याच्या डाव्या हातातील डमरू परमाणूची उत्पत्ती, उजव्या हातातील अग्नी परमाणूचा विनाश दर्शवते. अभय मुद्रेचा हात आपली सुरक्षा आणि दुसरा हात वरदान देणारा आहे.
२. पूजन साहित्यामधील शक्ती
उज्जैन येथील धर्म विज्ञान शोध संस्थानच्या शास्त्रज्ञांनी शिवलिंगावर अर्पण करण्यात येणार्या पूजा साहित्याविषयी संशोधन केले आहे. त्यात त्यांनी ‘शिवलिंग आणि अणूभट्टी यांच्यात समानता आहे’, असे म्हटले आहे. ज्योतिर्लिंगामधून सर्वाधिक ऊर्जा मिळते. या ऊर्जेला नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यावर पाणी वाहण्यात येते.
संस्थानचे ज्येष्ठ धर्म शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र जोशी यांनी म्हटले की, अणूभट्टीमध्ये कार्डिएक ग्लाएकोसाइट्स कॅल्शियम ऑक्सिलेट, फॅटी अॅसिड, यूरेकिन, टॉक्सिन हे आगीचे पदार्थ सापडतात. तसेच शिवलिंगातून निर्माण होणार्या उष्णतेला नियंत्रित करण्यासाठी शिवपूजेमध्ये मंदारचे फूल आणि बिल्व पत्र वाहिले जाते. ते अशा ऊर्जेला नियंत्रित ठेवतात.
धर्म विज्ञान शोध संस्थानचे वैभव जोशी यांच्या मते दुधामध्ये फॅट, प्रोटीन, लॅक्टिक अॅसिड; दहीमध्ये विटामिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मधामध्ये फ्रक्टोस, ग्लुकोज सारखे डायसेक्रायड, ट्रायसेक्रायड, प्रोटीन, एंजाइम्स असतात. दूध, दही आणि मध शिवलिंगावर कवच निर्माण करतात. तसेच शिवमंत्रांच्या ध्वनीमुळे ब्रह्मांडाध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
३. बिल्वपत्रामुळे उष्णतेवर नियंत्रण
बिल्वपत्रामुळे उष्णता नियंत्रित केली जाते. यामध्ये टॅनिन, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम और मॅग्नेशियम आदी रसायने असतात.
४. रुद्राक्ष
काशी हिंदू विश्वविद्यालयाचे ज्योतिषाचार्य पं. गणेश मिश्रा यांच्यामते शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये सांगितले आहे की, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंमुळे झाली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार रुद्राक्षामध्ये असणारे गुण मनुष्याची ‘नर्वस सिस्टम’ चांगली ठेवते. त्यात केमो फॉर्मेकोलॉजिकल नावाचा गुण सापडतो. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित रहाते. हृदयाचे आजारही न्यून होतात. रुद्राक्षामध्ये आर्यन, फॉस्फरस, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात.