पनवेल – रायगड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त ७१ ठिकाणी सनातन संस्थेची ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आध्यात्मिक आणि आपत्कालीन विषयावरील ग्रंथ घेण्यास जिज्ञासूंनी रस दाखवला. अलिबाग येथे काशी विश्वेश्वर मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला मंदिराचे विश्वस्त श्री. आनंद गुरव; गुळसुंदे, रसायनी येथील शिवमंदिरात श्री संप्रदायाचे बाळकृष्ण देशमुख यांनी; करंजाडे येथील शिवमंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला विचुंबे गावाचे सरपंच वासुदेव भिंगारकर आणि करंजाडे गावाचे उपसरपंच श्री. शेखर शेडगे; खांदेश्वर येथील शिवमंदिरात भाजपचे नगरसेवक गणेश पाटील; पेण येथील पाटणेश्वर शिवमंदिरात नगरपरिषदेच्या माजी सभापती सौ. दर्शना म्हात्रे यांनी; सेक्टर ५, नवीन पनवेल येथील शिवमंदिरात शिवसेना महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि त्यांच्या सदस्या; तसेच कळंबोली येथील शिवमंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला रायगड जिल्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. मलबारी यांनी भेट दिली.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > महाशिवरात्रीनिमित्त रायगड जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
महाशिवरात्रीनिमित्त रायगड जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
- कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
- पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !
- सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !
- पुणे येथे नवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमांना देवी-भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
- नवरात्री निमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !