महाशिवरात्रीला (२१ फेब्रुवारी या दिवशी) असलेल्या सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या ८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष २०१२ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या स्वरूपातील ‘sanatan.org’ या संकेतस्थळाचा शुभारंभ झाला. शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार आणि हिंदुहितासाठी कार्य या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे. संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात धर्मशास्त्रीय ज्ञान आणि पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान या दोहोंचा समावेश आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ अध्यात्मशास्त्रातील जिज्ञासूंपासून धर्मप्रसारकांपर्यंत आणि हिंदु समाजापासून अखिल मानवजातीपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे.
२१.२.२०२० या दिवशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा ८ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने संकेतस्थळाच्या माध्यमातून झालेल्या कार्याचा आढावा येथे दिला आहे.
१. संकेतस्थळाच्या वाचकसंख्येत सातत्याने वृद्धी होत असणे
संकेतस्थळाला भेट देणार्या वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध माध्यमांतून सनातन संस्थेवर ‘आतंकवादी संस्था’ असे दिशाभूल करणारे आरोप होत असतांनाही वाचकांनी मात्र सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणे चालूच ठेवले आहे, किंबहुना त्यात वाढच होत आहे. हे संकेतस्थळ जगभरातील १८० हून अधिक देशांत बघितले जाते. वर्ष २०१९ मध्ये सरासरी १ लक्ष ६० सहस्रांहून अधिक वाचकांनी प्रतिमास ‘sanatan.org’ या संकेतस्थळाला भेट दिली. सध्या हे संकेतस्थळ मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि तमिळ या सहा भाषांमध्ये कार्यरत आहे. लवकरच मल्याळम् भाषिक वाचकांनाही या संकेतस्थळाचा लाभ घेता येईल.
२. अध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन तत्परतेने करण्यात येणे
आतापर्यंत संकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. कर्मकांड, विविध व्रते, देवघर, पूजाविधी, प्रदक्षिणा, वास्तूशुद्धी, अग्निहोत्र, सूर्योपासना, पूर्वजांचा त्रास, श्राद्ध, अंत्यविधी, सुतक, वाईट शक्ती, सुख आणि शांती मिळवण्यासाठी काय करावे ? तसेच कुलदेवता, नामजपातील अडथळे, आध्यात्मिक पातळी, गुरु करणे, गुरुबंधू आदी अध्यात्मातील अनेक अंगांविषयी जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्याची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्नांना ४८ घंट्यांत उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे.
३. सर्वाधिक वाचले गेलेले भाषानिहाय लेख
लेखाचे नाव | भाषा | भेट देणार्यांची संख्या |
१. ‘मेथड ऑफ कास्टिंग ऑफ द इव्हिल आय युजिंग सॉल्ट अॅण्ड रेड चिलीज टुगेदर’ (मीठ आणि मिरच्या यांच्या वापराने दृष्ट कशी काढावी ?) | इंग्रजी | ३८,०३४ |
२. भारतात दिसणारे सूर्यग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फळ | कन्नड | २२,०२२ |
३. गुरु आणि गुरूंचे जीवनातील महत्त्व ! | मराठी | २०,२०९ |
४. गमले में पौधा कैसे लगाएं और उसकी देखभाल कैसे करें ? (कुंडीत झाड कसे लावावे आणि त्याची निगराणी कशी ठेवावी ?) | हिंदी | १०,३६४ |
५. नमस्कार कसा करावा ? | गुजराती | १४११ |
६. श्री गणपतीची काही नावे आणि त्यांचा अर्थ | तमिळ | १३४२ |
४. विविध विषयांवर उपलब्ध असलेले संकेतस्थळावरील लेख
संकेतस्थळावर ‘धर्म, धर्मग्रंथ, अध्यात्म, सोळा संस्कार, धार्मिक कृती, सण, उत्सव व व्रते, हिंदु देवता, याचसमवेत ‘अध्यात्मातील अपसमज आणि त्यांचे खंडण’, ‘पाश्चात्त्य (कु)संस्कृतीचे अंधानुकरण कसे टाळावे ?’, ‘भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुणा’ आदी विषयांवरील लेख उपलब्ध आहेत.
५. ‘सनातन पंचांगाच्या अॅप’द्वारे पाठवण्यात
येणार्या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन पंचांगाच्या ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस्’ या ‘अॅप’द्वारे पाठवण्यात येणार्या मराठी, कन्नड, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळे लाखो वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.
६. संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
६ अ. श्री. जितेंद्र विजय मुरकुटे : आपली संस्कृती आणि धर्म जपण्याचे जे काम आपण करत आहात, त्याबद्दल खरंच समाधान वाटत आहे. ‘या संकेतस्थळाबद्दल मला थोडे उशिरा कळले; पण कळले तेच महत्त्वाचे आहे’, असे मी समजतो.
६ आ. राजू धारियान्नानवर : हे एकमेव स्थान आहे, जेथे खर्या अर्थाने स्वस्वरूप जाणण्याची शिकवण दिली जाते आणि जिज्ञासूकडून आध्यात्मिक प्रगतीवाचून कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याला हे ज्ञान दिले जाते.
६ इ. नीलिमा राऊत : इतकी शास्त्रीय माहिती इतर कुठेही मिळत नाही.
६ ई. श्री. हेमंत अग्रवाल : प्रत्येकाने सनातन संस्था सांगत असलेली तत्त्वे अवलंबून समाधानकारक आयुष्याकडे वाटचाल करायला हवी.
या संकेतस्थळावरील ‘ऑनलाइन धर्मदान(डोनेशन)’ देण्याच्या सुविधेमुळे अनेक वाचकांनी या सुविधेचा लाभ घेतला. आपणही या सुविधेद्वारे धर्मदान देऊन धर्मपुण्य वाढवू शकता. धर्मदान देण्यासाठी भेट द्या ! https://www.sanatan.org/en/donate
७. सनातन संस्थेचे संकेतस्थळ,तसेच इतर सामाजिक संकेतस्थळे यांची लिंक
माध्यम | लिंक |
१. संकेतस्थळ | www.sanatan.org |
२. फेसबूक | www.facebook.com/sanatan.org www.facebook.com/sanatan.english |
३. ट्विटर | www.twitter.com/sanatansanstha |
४. इन्स्टाग्राम | www.instagram.com/sanatansansthaofficial |
५. पिंटरेस्ट | www.pinterest.com/sanatansanstha |
७ अ. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाची ‘लिंक’ इतरांनाही पाठवून त्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश पोचवा !
संपूर्ण जगाला सध्या अध्यात्म आणि साधना यांविषयीच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनानुसार सनातन संस्था अध्यात्माविषयीचे ज्ञान जगभरातील जिज्ञासूंपर्यंत पोचवू शकत आहे. सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लेख वाचून तुम्हाला काही लाभ झाला असल्यास या संकेतस्थळाची, तसेच सामाजिक संकेतस्थळांची ‘लिंक’ तुमचे परिचित आणि कुटुंबीय यांना न विसरता पाठवा. ‘जे या आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात आहेत, त्या सर्वांपर्यंत हा ज्ञानरूपी प्रकाश पोचू दे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !
ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
येणार्या भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी उपयुक्त असे बहुमूल्य लिखाण ‘sanatan.org’ वर उपलब्ध ! नाडीभविष्य सांगणार्या अनेकांनी, तसेच द्रष्ट्या साधू-संतांनी ‘वर्ष २०२० नंतर हळूहळू तिसर्या महायुद्धाला आरंभ होणार आहे’, असे सांगितले आहे. ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’, या सिद्धांतानुसार समाजातील सर्वांनाच या आपत्काळाची झळ बसणार आहे. आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डीझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक-व्यवस्थाही कोलमडून पडते. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी उपलब्ध होणेही जवळजवळ अशक्यच असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी सर्वच स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे लेख सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. वाचक पुढे दिलेल्या लिंकवर हे लेख वाचू शकतात. https://www.sanatan.org/mr/natural-disasters-and-survival-guide |