सानपाडा येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन
नवी मुंबई – आपल्या जीवनात आनंद मिळावा, यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो; पण आनंद कसा मिळवायचा ? हे शाळा किंवा महाविद्यालय येथे शिकवले जात नाही. आनंद मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधना करतांना प्राथमिक टप्प्यात स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया करणे अन् नामजप करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती अशा टप्प्याटप्प्याने साधना केल्यास आपण आपल्या जीवनात आनंद अनुभवू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी सानपाडा येथील हिमगिरी सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या प्रवचनात केले. सौ. धनश्री केळशीकर यांनी मार्गदर्शनातून धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची आवश्यकता सर्वांच्या मनावर बिंबवली. या प्रवचनासाठी हिमगिरी सोसायटीचे विशेष सहकार्य लाभले.