डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे कुटुंबियांच्या वेळोवेळी होत असलेल्या हस्तक्षेपांमुळे खटला चालत नाही, याविषयीही, तसेच खरे गुन्हेगार शोधण्यासाठीही गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष घालावे !
कोल्हापूर – कॉ. पानसरे यांच्या खुनास ५ वर्षे उलटली, तरी अन्वेषण समाधानकारक नाही. गुन्हेगार पसार आहेत. गुन्ह्यातील वाहन आणि शस्त्रे यांचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर श्रमिक प्रतिष्ठान आणि आयटक कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी सतेज पाटील यांनी ‘अन्वेषणाविषयी नवे सरकार गंभीर आहे. विधानसभा अधिवेशनाच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमवेत एक बैठक आयोजित करू. अन्वेषण अधिकारी आणि अधिवक्ता यांच्याशी सखोल चर्चा करून माहिती घेऊ, असे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले.(डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे कुटुंबियांनी प्रविष्ट केलेल्या याचिकांमुळेच, तसेच हे कुटुंबीय सातत्याने निर्माण करत असलेल्या अडथळ्यांमुळेच कॉ. पानसरे अन् डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील खटला चालत नाही. याविषयी वेळोवेळी न्यायालयानेही दोन्ही कुटुंबियांना सक्त ताकीद दिली आहे. ‘खटला चालत नसल्याने संशयितांना जामीन मिळत नाही. मग त्यांनी अमर्यादित काळ कारागृहात राहायचे का ?’, असा प्रश्नही नुकताच उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. आतापर्यंत गेल्या ५ वर्षांत अन्वेषण यंत्रणेने केलेल्या अन्वेषणात काहीच निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी खर्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालावे ! – संपादक)