अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली
अमरावती – आज धर्माचरणाच्या अभावामुळे हिंदु संस्कृतीची हानी होत आहे. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रतिदिन सर्वांनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी केले. ते येथील आझाद हिंद मंडळाच्या मैदानावर ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलत होते. सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून झाला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी करून दिला. त्यानंतर स्वरक्षणाची प्रात्याक्षिके दाखवण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता जामोदे यांनी केले.