वाराणसी – तुमचे हे राष्ट्रजागृतीचे पवित्र कार्य पाहून मी धन्य झालो. मी खर्या अर्थाने आध्यात्मिक जगात जगत आहे, असा अनुभव येथे होत आहे. केवळ येथेच मी पाहिले की, येथील एक एक शब्द राष्ट्रप्रेमाने भरलेला आहे. सनातन संस्थेचे साधक वानरसेनेप्रमाणे प्रभु श्रीरामाचेच कार्य करत आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, आज सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात यायची संधी मिळाली, असे उद्गार उत्तरप्रदेश येथील श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज टाटंबरी यांनी काढले. त्यांनी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला नुकतीच भेट दिली. त्या वेळी बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी त्यांना समिती करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. या वेळी गाजीपूर येथील उद्योजक श्री. श्रीकांय जयस्वाल हेही उपस्थित होते.
श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज टाटंबरी यांचा परिचय
श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज संपूर्ण भारतभ्रमण करून लोकांना अध्यात्म आणि भारतीय संस्कृती यांविषयी जागृत करतात. ते सुप्रसिद्ध कथावाचकही आहेत. ते पादत्राणाविना सर्वत्र भ्रमण करतात. मारुतिरायांनी सूक्ष्मातून केलेल्या आज्ञेनुसार महाराज केवळ सुती कापड परिधान करतात. ४० दिवस महाराजांनी उभे राहून अनुष्ठान केले आहे.