रामनाथी – नाशिक येथील ‘आयादी ज्योतिष वास्तू’ संस्थेच्या संचालिका सौ. शुभांगिनी पांगारकर, ‘समर्थ ज्योतिष वास्तू’ या संस्थेच्या संचालिका सौ. वसुंधरा संतान आणि ‘स्वस्तिक ज्योतिष वास्तू’ या संस्थेच्या संचालिका सौ. स्मिता मुळे यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातन संस्थेचे श्री. रूपेश रेडकर यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन कार्याची माहिती दिली. या वेळी त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी आणि ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे यांच्याशी संवाद साधला.
मान्यवरांचा परिचय
१. सौ. शुभांगिनी पांगारकर यांनी ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, डाऊझिंग (लोलक चिकित्सा), अंकशास्त्र, नाडीज्योतिष, रमल या विषयांत पदवी प्राप्त केली आहे.
२. सौ. वसुंधरा सुनील संतान यांनी ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, रेकी, डाऊझिंग (लोलक चिकित्सा), अंकशास्त्र या विषयांत पदवी प्राप्त केली आहे.
३. सौ. स्मिता मुळे यांनी ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, नक्षत्रज्योतिष, डाऊझिंग (लोलक चिकित्सा), लाल किताब या विषयांत पदवी प्राप्त केली आहे.
तीनही मान्यवरांना मे २०१९ मध्ये नाशिक येथे आयोजित केलेल्या ‘पहिल्या राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशना’त ज्योतिष क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी ज्योतिष महर्षि श्री. व.दा. भट यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.
सनातन आश्रमासंदर्भात काढलेले गौरवोद्गार
१. सौ. वसुंधरा संतान आणि सौ. स्मिता मुळे : आश्रमात पुरुष साधकही सर्व प्रकारच्या सेवा करतात, हे चांगले आहे.
२. सौ. शुभांगिनी पांगारकर : आश्रमातील नियोजन आणि स्वच्छता चांगली आहे.
तिन्ही मान्यवरांनी आश्रम जिज्ञासेने पाहिला. ‘आश्रमातील स्पंदने अप्रतिम आणि अत्यंत चांगली आहेत. आश्रमाच्या ईशान्येला प्रवेशद्वाराकडील विहीर आणि कमळपीठ, वायव्य दिशेला असलेला ‘बायोगॅस प्रकल्प’ आदी सर्वच वास्तूशास्त्रानुसार आहे. वास्तुशास्त्रानुसार इतकी योग्य बांधणी अत्यल्प ठिकाणी पाहायला मिळते’, असे त्या म्हणाल्या.