चीन सरकारकडून मांसाहार सोडून शाकाहार करण्याचा जनतेला आदेश

कोरोना विषाणूंचा परिणाम

हिंदु धर्मामध्ये शाकाहाराचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मांसाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मांसाहाराचे दुष्परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित होतात !

बीजिंग (चीन) – चीन सरकारने कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर चिनी जनतेला मांसाहार सोडून शाकाहार करण्याचा आदेश दिला आहे. सरकारने चीनच्या हुबेई प्रांतातील सर्व २१ शहरांमध्ये मांसाहारावर बंदी घातली आहे. तसेच शेतकर्‍यांना भाज्यांचे उत्पादन करण्यास सांगितले आहे. चीनकडून त्याच्या शेजारील देशांकडून भाज्या आणि फळे आयात करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. तसेच चीनच्या कृषी मंत्रालयाने आदेश दिला आहे की, देशातील सर्व यंत्रणांनी शेती उत्पादने वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून देशाला त्यांचा तुटवडा भासू नये.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment