वसई (जिल्हा पालघर) – प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी-अधिक प्रमाणात स्वभावदोष असतात. स्वभावदोषांमुळे आध्यात्मिक, तसेच व्यावहारिक जीवनातही हानी होते. आपल्यात थोडा जरी अहं असेल, तरी ईश्वराशी एकरूप होता येत नाही. म्हणून साधना करणार्याने जाणीवपूर्वक स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवली पाहिजे, असे मार्गदर्शन श्री. भरत कडूकर यांनी केले. येथील रामेदी येथील राम मंदिरात सनातन प्रभातचे वाचक आणि हितचिंतक यांच्यासाठी आयोजित साधना शिबिरात ते बोलत होते.
श्री. पंडित चव्हाण यांनी मनुष्याचे अंतिम ध्येय काय ?, गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व आणि वैशिष्ट्य यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा जिज्ञासूंनी लाभ घेतला. उपस्थितांनी सप्ताहातून एक दिवस सत्संग घेण्याची मागणी केली.