गुरुतत्त्व हे श्रेष्ठ तत्त्व असून जिज्ञासू शिष्य झाल्यावर गुरु सदेह
त्याच्या जीवनात येतात ! – नागेश गाडे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके
रामनाथी (गोवा) – प्रारब्ध भोगणे आणि ईश्वरप्राप्ती करणे, या हेतूंसाठी मनुष्याचा जन्म होतो. जिवाच्या अनेक जन्मांतील कर्मांनुसार त्याच्या पाप-पुण्याचा होणारा संचय म्हणजे संचित होय. जन्माच्या वेळी यातील काही भाग प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी येतो. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. ईश्वरप्राप्तीसाठी जीवनात गुरूंची आवश्यकता असते. गुरुतत्त्व हे श्रेष्ठ तत्त्व असून जिज्ञासू शिष्य झाल्यावर गुरु सदेह त्याच्या जीवनात येतात, असे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमात ३१ जानेवारीला ‘साधना शिबिरा’चा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. सनातन संस्थेचे जिज्ञासू आणि हितचिंतक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. हे शिबिर २ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.