(म्हणे) ‘बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव पुढे येत आहे !’ – ‘पॉवर टीव्ही’ कन्नड वृत्तवाहिनी

‘पॉवर टीव्ही’ या कन्नड वृत्तवाहिनीकडून सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

कुठेही असा प्रकार घडला की, सनातन संस्थेवर चिखलफेक करून तिची अपकीर्ती करण्याची संधी सनातनद्वेष्टी प्रसारमाध्यमे शोधत असतात ! अशी प्रसारमाध्यमे समाजाला दिशादर्शन काय करणार ?

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील ‘पॉवर टीव्ही’ या वृत्तवाहिनीने मंगळुरू विमानतळाच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याच्या संदर्भात २२ जानेवारी या दिवशी वृत्त प्रसिद्ध करतांना याचा संबंध सनातन संस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला. यात म्हटले, ‘या प्रकरणी पोलिसांना शरण आलेला आदित्य राव आणि सनातन संस्था यांचे संबंध आहेत का ? सनातन संस्थेचा जयप्रकाश याचा यात हात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. जयप्रकाश एन्.आय.ए.च्या सूचीमध्ये पसार (फरार) आतंकवादी म्हणून घोषित आहे. तो वर्ष २००९ च्या मडगाव स्फोटात सहभागी असलेला आरोपी आहे. तो मडगाव स्फोटानंतर भूमीगत झाला. या विषयी मंगळुरू पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हे प्रकरण तेवढे सोपे नाही. वेगवेगळ्या पैलूंवर पोलीस अन्वेषण करत आहेत. पोलीस सनातन संस्था आणि आदित्य राव यांचे संबंध आहे का, याचे अन्वेषण करत आहेत’, असे म्हटले आहे.

 

आदित्य राव याचा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही ! – पोलीस आयुक्त डॉ. हर्षा

सनातनद्वेष्ट्या वृत्तवाहिन्यांना मंगळुरू पोलीस आयुक्तांची चपराक !

आदित्य राव याचा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही. रात्रभर त्याची चौकशी करण्यात आली. तो एकटा आहे. त्याच्या विरोधात धमकी देण्याची ३ प्रकरणे प्रविष्ट आहेत. विमानतळ आस्थापनात काम न मिळाल्याने तो निराश होता. त्यामुळे त्याने विमानतळ प्रशासनाला त्रास देण्याचे ठरवले होते.

 

विमानतळ प्रशासनाकडून सुरक्षारक्षकाची नोकरी
नाकारण्यात आल्याने बॉम्ब ठेवला ! – आरोपीची स्वीकृती

मंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० जानेवारी या दिवशी एक संशयास्पद बॅग आढळली होती. त्याची बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने पडताळणी केली असता त्यात बॉम्ब सापडला होता. या संदर्भात आदित्य राव याने पोलिसांत शरण येऊन त्यानेच बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. ‘बेंगळुरू येथील विमानतळ प्रशासनाने २ वेळा  सुरक्षारक्षकाची नोकरी नाकारण्यात आल्याचा सूड घेण्यासाठी  हे कृत्य केले’, असे त्याने सांगितले. त्याने तो बॉम्ब आणला कुठून, त्यासाठी त्याला स्फोटके कोणी पुरवली या गोष्टींचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

आदित्य राव हा कर्नाटकातील मणिपाल येथील राहणारा असून तो अभियांत्रिकी आणि एम्.बी.ए.चा पदवीधारक आहे. त्याला यापूर्वी वर्ष २०१८ मध्ये बेंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा दूरभाष केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या वेळी तो ५ मास कारागृहात होता. आदित्य राव याच्या आईचा मृत्यू झाला असून त्याचे वडील मंगळुरूमध्येच राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment