
ब्रह्मपुरी (मध्यप्रदेश) – गणपति नाका भागातील गणपति मंदिरात संकष्टी चतुर्थी यात्रेनिमित्त भव्य धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनास रामझरोका मंदिराचे विश्वस्त नर्मदागिरीनंदजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. तसेच महापौर अनिल भोसले यांनीही प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. या प्रदर्शनाचा १० सहस्र भाविकांनी लाभ घेतला. लावण्यात आलेले धर्मशिक्षण फलक प्रदर्शन भाविक लक्षपूर्वक वाचत होते आणि छायाचित्रही काढत होते. मंदिराचे पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी प्रदर्शन लावण्यासाठी साहाय्य केले.