‘८.१२.२०१९ या दिवशी ‘विदुषी गंगूबाई हनगल गुरुकुल, हुब्बळ्ळी’ येथील संगीत गुरु आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित गणपति भट यांनी फोंडा, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत त्यांचे बंधू श्री. शांताराम भट आणि त्यांचे शिरसी येथील शिष्य श्री. विनायक हेगडे हे होते. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका डॉ. (कु.) आरती तिवारी यांनी पंडित गणपति भट यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चालू असलेले संशोधनकार्य यांविषयी अवगत केले. त्या वेळी पंडित गणपति भट म्हणाले, ‘‘हे केंद्र खरेच चांगले आहे.’’
श्री. शांताराम भट यांनी सांगितले, ‘‘येथून आम्हाला एक प्रकारची ऊर्जा आणि सकारात्मकता मिळाली.’’ ‘मी आमच्या कुटुंबियांनाही पुढच्या वेळी घेऊन येणार आहे’, असेही श्री. शांताराम भट यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.
त्यांना विविध वस्तूंवर सूक्ष्मातून झालेले चांगले आणि अनिष्ट परिणाम दर्शवणारे सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून आश्चर्य वाटले.
शास्त्रीय गायक पंडित गणपति भट यांनी हुब्बळ्ळी
येथील साधिका सौ. विदुला हळदीपूर यांच्याशी बोलतांना व्यक्त केलेले मनोगत !
१. शास्त्रीय गायक पंडित गणपति भट यांनी महर्षि अध्यात्म
विश्वविद्यालयाच्या फोंडा, गोवा येथील संशोधन केंद्राविषयी काढलेले कौतुकोद्गार !
अ. ‘मला येथे येऊन पुष्कळ आनंद झाला. मी आजपर्यंत कुठेही असे ठिकाण पाहिले नाही.
आ. मला पुन्हा येथे यायचे आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या संगीत विषयक संशोधनात मला सहभागी व्हायला आवडेल. मी तुम्हाला ‘कशा प्रकारे सहकार्य करू शकतो ?’, ते मला सांगा.
इ. येथील साधक उच्चशिक्षित असूनही त्यांनी साधनेसाठी जीवन समर्पित केले आहे, हे पाहून पुष्कळ आश्चर्य वाटले. येथे कोणच्याही संदर्भात दुजाभाव जाणवत नाही.
ई. माझ्याकडे शिकायला येणार्या शिष्यांना मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाविषयी सांगितले. मी त्यांना सांगितले, ‘‘कधी गोव्याला गेलात, तर एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्या.’’