नागपूर – हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा आणि श्रद्धेने धर्माचरण करा. देव असल्याची प्रचीती तुम्हाला आल्याविना राहणार नाही. टिळा लावणे, वाढदिवस तिथीनुसार साजरा करणे, हस्तांदोलन न करता नमस्कार करणे, फीत कापून उद्घाटन न करता नारळ वाढवून करणे अशा लहान-लहान कृतींतून धर्माचरण करून आपला धर्म आणि संस्कृती यांविषयीचा अभिमान वृद्धींगत करू शकतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैशाली परांजपे यांनी केले. हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात साधना आणि धर्माचरण यांचे महत्त्व विशद करतांना त्या बोलत होत्या.
येथील चिखलीचा राजा, श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात १२ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला पुष्कळ धर्माभिमानी उपस्थित होते.