काल झारखंड येथून कर्नाटक पोलिसांनी कारवाई करत गौरी लंकेश हत्येप्रकरणी ऋषिकेश देवडेकर यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आम्हाला समजले आहे. आम्ही या प्रकरणी अधिक माहिती घेत आहोत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार श्री. देवडेकर हे काही वर्षांपूर्वी आमच्या कार्यात सहभागी असत; मात्र गेली 8-10 वर्ष ते सक्रीय नाहीत. ते मध्यंतरी अन्य संघटनांच्या माध्यमातूनही कार्य करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी सनातनच्या कार्यात सहभागी असलेल्या एखाद्याला आता एखाद्या प्रकरणात अटक झाली; म्हणून त्याचा दोष सनातन संस्थेला देणे अयोग्य आहे. सनातन संस्था ही अध्यात्मप्रसाराचे कार्य करते. सनातन संस्थेचा कोणत्याही हत्या प्रकरणांशी दुरान्वयेही संबंध नाही, असे सनातन संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.