पुणे येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शनाला वाचक आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांचा आयोजनात कृतीशील सहभाग

मार्गदर्शनाला उपस्थित जिज्ञासू

पुणे – सनातन संस्थेच्या वतीने सोमवार पेठेतील काळाराम मंदिर येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मार्गदर्शनाला ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, मंदिरात येणारे रामभक्त यांसह १५० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. ज्योती दाते यांनी काळानुरूप गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व सांगून सर्वांना अंतर्मुख केले. सर्वच मानवी जिवांना आनंदस्वरूप असणार्‍या ईश्‍वराची ओढ आणि मानवेतर योनींना असणार्‍या मर्यादा सोदाहरण सांगून त्यांनी उपस्थितांना साधना करण्यासाठी प्रवृत्त केले. अष्टांग साधनामार्गातील स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, नामस्मरण, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग अन् निरपेक्ष प्रीती यांचे सविस्तर निरूपण करून विहंगम गुरुकृपा संपादन करण्यासाठी जिज्ञासूंना प्रेरित केले. मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्या प्रदर्शन कक्षालाही चांगला प्रतिसाद लाभला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment