४ ते १२ जानेवारी २०२० या कालावधीत विश्व पुस्तक मेळाव्याचे आयोजन

नवी देहली – येथील प्रगती मैदानामध्ये ४ ते १२ जानेवरी २०२० या कालावधीत विश्व पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. याचा शुभारंभ ४ जानेवारीला दीपप्रज्वलन आणि प्रार्थना करून करण्यात आला.

हिंदी ग्रंथांचे प्रदर्शन सभागृह क्रमांक १२ ए मध्ये स्टॉल क्र. ६६-६७ येथे आहे. तसेच इंग्रजी ग्रंथांचे प्रदर्शन सभागृह क्र. ८-११ मध्ये स्टॉल क्र. २६८ येथे आहे. या प्रदर्शनामध्ये सनातननिर्मित विविध विषयांवरील, उदा. अध्यात्म, राष्ट्ररक्षण, धर्म, धर्मावर होणारे आघात, साधना, धार्मिक कृती, बालसंस्कार, आयुर्वेद आदी ग्रंथ आहेत. सनातन संस्थेने आतापर्यंत १७ भाषांमध्ये ३२२ ग्रंथ आणि त्यांच्या ७८ लाख ५४ सहस्रांहून अधिक प्रती प्रकाशित केल्या आहेत.