सांगली – मानवी जीवनात प्रत्येक टप्प्यात अडचणी येतात. यातील अनेक अडचणी आपल्या दोषांमुळेही निर्माण होतात. या अडचणी सोडवण्यासाठी आपण दोषांवर प्रयत्न केल्यास त्या लवकर सुटतील. दोषांमुळे आपल्याला विविध शारीरिक व्याधीही होतात. त्यामुळे दोषनिर्मूलनासाठी प्रयत्न केल्यास यातून मुक्तताही लवकर होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. विद्या जाखोटिया यांनी केले. त्या निशांत कॉलनी येथील श्री महादेव मंदिरात सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी यांच्यासाठी आयोजित साधना शिबिरात बोलत होत्या. या वेळी सौ. कल्पना थोरात यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.