शिक्षक आणि गुरु

 

गुरु हे चोवीस तास शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडे असते. शिक्षक मात्र ठराविक वेळच शिकवतात आणि विद्यार्थ्याकडून शिकवणीची ‘फी’ मिळाली म्हणजे बाजूला होतात. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे मोल करता येत नाही, त्यामुळे शिष्य गुरूंचा सदैव ऋणी असतो. शिक्षक आणि गुरु यांतील असे इतर भेद पुढील सारणीत दिले आहेत.

‘गुरु’ ही धारणा भारतीय आहे. गुरूंना पाश्चिमात्य भाषांत शब्द नाही.

शिक्षक

गुरु

१. वैशिष्ट्ये सर्वसामान्य असामान्य
अ. ज्ञान दुसर्‍याकडून घेतलेले कि स्वतःचे ? ज्ञान दुसरीकडून मिळवलेले स्वतःच्या अनुभूती
आ. ज्ञानाचा स्वतःवर होणारा परिणाम ज्ञान मिळवणे आणि पंडित होणे स्वतः रूपांतरीत होणे
इ. तात्त्विक माहिती आणि जीवन यांचा संबंध जे जाणले आहे, त्याप्रमाणे न जगणे जे जाणले त्याप्रमाणे जगणे
ई. आचरण नीतीशास्त्र शिकवणे; पण तसे आचरण नसणे ‘बोले तैसा चाले ।’ याप्रमाणे असणे
उ. अहंकार वाढणे न्यून होणे
२. शिकवणे
अ. संबंध कशाशी ? बुद्धीशी त्यांच्या गुरूंशी किंवा आत्म्याशी, हृदय, प्रेम
आ. शिकवण्याचा विषय अ. जे जाणतात ते अ. जे आवश्यक ते
आ. व्यावहारिक आ. आध्यात्मिक
इ. शिकवण्याचे स्वरूप माहिती देणे अनुभूती देणे
ई. शिक्षणाचे महत्त्व अ. प्रमाणपत्र मिळणे अ. सर्व समस्यांचे निवारण
आ. पैसे मिळवण्याचे साधन उपलब्ध होणे आ. जीवन-मरणापासून मुक्त होणे
उ. श्रद्धेची आवश्यकता नसणे असणे
३. विद्यार्थी / शिष्य यांच्याशी संबंध
अ. बुद्धीची देवाणघेवाण होणे नाही.

गुरूंनी देणे आणि शिष्याने घेणे

आ. संबंधाचे प्रमाण अंशरूप परिपूर्ण
इ. संबंधाचे स्वरूप विषयापुरते, व्यावसायिक संपूर्ण जीवनाशी संबंध
ई. संबंधाचा कालावधी शिक्षण चालू असेपर्यंत संबंध अखंड, समग्र आणि सतत
उ. परतफेड शक्य.

शिक्षणाच्या बदल्यात पैसे दिले जाणे

अशक्य.

गुरु जे देतात, त्याचा मोबदला देऊच न शकणे

ऊ. आदराचे स्वरूप औपचारिक मनापासून आदर
४. परिणाम
अ. संस्कार मनावर संस्कार होणे संस्कारांपासून मुक्त होणे
आ. शिकणे नवीन शिकणे शिकलेले विसरण्यास शिकवणे

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०) (आताचे सनातनचे २७ वे संत पू. (डॉ.) वसंत आठवले)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि वागणे’

Leave a Comment