मद्यपानामुळे सरकारला महसूल मिळत असला, तरी त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होतो, हेच यातून स्पष्ट होत आहे. यासाठी संपूर्ण देशातच मद्य विक्री आणि मद्यपान यांवर बंदी घातली पाहिजे !
नवी देहली – भारतात मद्यपान करणारी प्रत्येक चौथी व्यक्ती मद्यपान केल्यावर हाणामारी करते, असे केंद्र सरकारच्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. तसेच मद्यपान करणारी प्रत्येक दुसरी व्यक्ती एका वेळेस कमीत कमी ४ ग्लास मद्य पिते. याला अधिक मद्यपान असे म्हटले जाते.
१. भारतात अशा प्रकारे मद्यपान करणारे ४३ टक्के आहेत. भारतात १४.६० टक्के लोक मद्यपान करतात. १० ते ७५ या वयोगटातील लोक मद्यपान करतात. लोकसंख्येच्या हिशोबाने १६ कोटी लोक मद्यपान करतात. यात सर्व स्तरावरील लोकांचा समावेश आहे. त्यातही ९५ टक्के पुरुष आहेत. १७ पुरुषांमागे एक महिला मद्यपान करते.
२. भारतात देशी मद्य आणि भारतात बनवण्यात येणारी विदेशी मद्य यांची सर्वाधिक विक्री होते. वाईन पिणार्यांची संख्या ४ टक्के आहे, तर बिअर पिणारे २१ टक्के आहेत. त्यातही कडक (स्ट्राँग) बिअर पिणारे १२, तर मध्यम बिअर पिणारे ९ टक्के आहेत. काही मद्यपी पाणी न मिसळताही मद्यपान करतात, असेही समोर आले आहे.
३. राजस्थानमध्ये २.१, तर मेघालयामध्ये ३.४ टक्के जण मद्यपान करता. त्रिपुरामध्ये ६२ टक्के, छत्तीसगडमध्ये ५७.२ टक्के आणि पंजाबमध्ये ५१.७० टक्के लोक मद्यपान करतात.
४. अरुणाचल प्रदेशमध्ये १५.६० टक्के, तर छत्तीसगडमध्ये १३.७० टक्के महिला मद्यपान करतात.
५. देशातील १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे ३० टक्के मद्यविक्री होते.