आपण हिंदु राष्ट्रासाठी त्याग केला, तर भावी पिढ्या ताठ मानेने जगतील ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

खारेपाटण येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेस ५ सहस्र ५०० हून अधिक उपस्थिती !

खारेपाटण (जिल्हा सिंधुदुर्ग), २९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०६० नंतर भारतात आता अल्पसंख्य असलेले मुसलमान बहुसंख्य होतील. ते या राष्ट्राला ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित करतील. त्यासाठी आताच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. आपल्या पूर्वजांनी देव, देश आणि धर्म यांसाठी त्याग केला; म्हणून आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत, तर आताच्या पिढीने हिंदु राष्ट्रासाठी त्याग केला, तर भावी पिढ्या विश्‍वामध्ये ‘हिंदु’ म्हणून ताठ मानेने जगतील, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या (खारेपाटण हायस्कूलच्या) भव्य पटांगणावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला संबोधित करत होत्या. २९ डिसेंबरला झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८१ व्या सभेला ५ सहस्र ५०० हिंदूंची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सभेच्या प्रारंभी श्री. राजेंद्र परब यांनी शंखनाद केला. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर रणरागिणी शाखेच्या अधिवक्ता (सौ.) कावेरी राणे, हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर उपस्थित होते. त्यानंतर पुरोहित श्री. मंदार मणेरीकर, श्री. सौमित्र पाध्ये यांनी चैतन्यमय वाणीत वेदमंत्रपठण केल्यावर मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या तेजस्वी वाणीने उपस्थितांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचे बीज रोवले.

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. सुमित सागवेकर, श्री. मनोज खाडये, सद्गुरु सत्यवान कदम, अधिवक्त्या सौ. कावेरी राणे आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय समितीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्री. आनंद मोंडकर आणि सौ. शिवानी रेडकर यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment