(म्हणे) ‘सूर्यग्रहण काळात खाणे आणि पिणे सुरक्षित !’

‘द हिंदु’ दैनिकांचे आध्यात्मिक अज्ञान जाणा !

मुंबई – उद्या म्हणजे २६ डिसेंबरला होणार्‍या सूर्यग्रहणाचे वृत्त अनेक दैनिकांनी प्रसिद्ध केले आहे. यातील ‘द हिंदु’ या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावरही याविषयीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात त्यांनी ‘या ग्रहणकाळात दैनंदिन खाणे आणि पिणे सुरक्षित आहे,’ असे म्हटले आहे. (विज्ञानाने अनेक शोध लावले असले, तरी ते अद्याप मानवी मनावर परिणाम होणार्‍या शक्ती, स्पंदन आणि सत्त्व, रज अन् तम यापर्यंत पोचलेलेच नाही. त्यामुळे पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणार्‍या भारतियांना आणि वृत्तपत्रांनाही ग्रहणकाळाचा मानवी मनावर काय परिणाम होतो, याविषयी प्रचंड अज्ञान आहे. या विषयात पाश्‍चिमात्य देश आणि विज्ञान मागासच आहे. असे असूनही भारतामध्ये ढोंगी धर्मनिरपेक्षता आणि पुरो(अधो)गामीत्व शिकवण्यात येत असल्याने महान हिंदु धर्माने केलेल्या याविषयीच्या अभ्यासाला आणि केलेल्या मार्गदर्शनाला ते बुरसटलेले किंवा सनातनी ठरवून मोकळे होतात ! त्यातूनच अशी वृत्तपत्रे किंवा ढोंगी पुरोगामी वरील विधाने करतात ! वास्तविक ग्रहण काळामध्ये रज-तम गुणांचे प्राबल्य वाढल्याने त्याचा परिणाम मानवी मनावर होतो आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी काही नियम अन् बंधने पाळण्यास सांगण्यात आली आहेत. त्यानुसार या काळात खाणे, पिणे वर्ज्य आदी म्हटले आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment