- देशभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात मानसिक आजाराने लोक त्रस्त असणे, हे चिंताजनक ! मानसिक आजारावर साधना करणे, हेच एकमात्र औषध असून त्यातून अनेक जण मानसिक आजाराने मुक्त होत आहेत, हे सप्रमाण सिद्ध झालेे आहे !
- आतापर्यंत शासनस्तरावर समाजाला साधना न शिकवल्याचे हे फलित आहे. साधना करणारा समाज हाच खर्या अर्थाने मानसिकदृष्ट्या सक्षम असतो !
नवी देहली – देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक आजाराने ग्रासलेली आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि काळजी (एंग्झायटी) या मानसिक आजारांनी पीडित असलेल्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. भारतात वर्ष १९९० पासून ते वर्ष २०१७ पर्यंत म्हणजेच २७ वर्षांच्या काळात भारतात १९.७ टक्के म्हणजेच २० कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत, अशी माहिती ‘लॅन्सेट सायकॅट्री’ नावाच्या ‘जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाली आहे. देशातील मानसिक आजाराचा अभ्यास ‘इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटीव्ह’ने केला आहे.
या ‘जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात अनेक गंभीर सूत्रे उपस्थित करण्यात आली आहेत. त्यातील काही सूत्रे पुढीलप्रमाणे –
१. मानसिक आजार असलेल्यांमध्ये ४ कोटी ६ लाख लोकांना नैराश्याने, तर ४ कोटी ५ लाख लोक काळजी करण्याच्या आजाराने ग्रासले आहेत.
२. भारतातील अर्धे वय उलटून गेलेल्या लोकांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे या अभ्यासात दिसून आले. मानसिक आजार हे आत्महत्येचेही कारण असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.