ऐरोली येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि गुणवृद्धी’ शिबिर

शिबिरार्थीना मार्गदर्शन करतांना श्री. सतीश कोचरेकर

ऐरोली – सनातन संस्थेच्या वतीने येथील सप्तश्रृंगी मंदिरात ‘साधना आणि गुणवृद्धी’ शिबिर घेण्यात आले. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी आणि साधनेत जलद प्रगती होण्यासाठी स्वभावदोष दूर करण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत सांगितली. हिंदु जनजागृतीचे समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी कुलदेवतेचे नामस्मरण कसे करावे ?, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ? या संबंधित उपस्थित शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. सौ. झाडे या जिज्ञासू शिबिराला थोडा वेळ थांबणार होत्या; परंतु त्यांना विषय इतका आवडला की, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना शिबिरासाठी बोलावून घेतले.

२. देवळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नामजपाचा विषय आवडला.

३. शिबिरात उपस्थित असलेल्या लहान मुलांनी पूर्ण मार्गदर्शन शांतपणे ऐकले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment