जंतूंच्या संसर्गापासून वाचण्यासाठी देहलीतील ‘एम्स’मधील डॉक्टरांकडून हस्तांदोलनाऐवजी ‘नमस्कार’ करण्याचा उपक्रम !

• सनातन संस्था गेली अनेक वर्षे हेच सांगत आहे. तसेच केवळ रोगांच्या जंतूंचाच संसर्ग होतो, असे नाही, तर आध्यात्मिकदृष्ट्याही हस्तांदोलन करण्याचे तोटे आहेत. यात समोरच्या व्यक्तीतील रज आणि तम गुण, तसेच नकारात्मक शक्तीचा परिणाम हस्तांदोलन करणार्‍याला होऊ शकतो. याउलट नमस्कारामुळे आध्यात्मिक लाभ आहेत.

• ऋषिमुनींना जे आधी कळले, ते आधुनिक वैद्यांना आता कळले आहे. यावरून ऋषिमुनींची महानता आपल्या लक्षात येते !

नवी देहली – येथील एम्स रुग्णालयामध्ये जंतूंच्या संसर्गापासून वाचण्यासाठी ‘नमस्कार’ करण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. येथील डॉक्टर आणि परिचारिका कोणत्याही व्यक्तीशी हस्तांदोलन करत नाहीत, तर नमस्कार करतात. जर हस्तांदोलन केले, तर हाताच्या स्पर्शामुळे जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे. यामुळे प्रतिजैविकांचा (अ‍ॅन्टीबायोटीक्सचा) वापरही न्यून होऊन उपचारही स्वस्त होतात आणि रुग्णही लवकर बरा होऊन रुग्णालयातून बाहेर पडू शकतो.

१. येथील कार्डियोथोरासिक विभागाचे प्रमुख डॉ. शिव चौधरी यांनी सांगितले की, आमचा उद्देश आहे की, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. हाताद्वारेच संसर्ग अधिक प्रमाणात होतो; कारण आपण हातानेच कोणत्याही वस्तूला प्रथम स्पर्श करतो. त्यानंतर हाताद्वारे स्वतःमध्ये जंतूंचे संक्रमण होते आणि नंतर इतरांमध्ये. यामुळेच आम्ही हात मिळवण्याऐवजी नमस्कार करून बोलण्याची सवय करत आहोत.

२. डॉ. चौधरी म्हणाले की, आपण स्वतः अनेकदा हात धुतो; मात्र ज्याच्याशी हस्तांदोलन करत आहोत, त्या व्यक्तीने तसे केले आहे का? हे आपल्याला ठाऊक नसते. आपण अशा व्यक्तीशी हात मिळवल्यावर आपल्याला संसर्ग होतो. यामुळेच नमस्कार करणे योग्य आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment