सप्टेंबर २०१९ मध्ये देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन अन् प्रवचने यांच्या माध्यमातून केलेला अध्यात्मप्रसार

 

१. गणेशोत्सवाच्या निमित्त ग्रंथप्रदर्शन

‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने ४ आणि ६.९.२०१९ या दिवशी गुरुग्राम येथील महाराष्ट्र मंडळात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

 

२. ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’ यांविषयी प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन

अ. देहली येथे १७.९.२०१९ या दिवशी महावीर मंदिरात (पहाडीवाला, जी. के. १) सनातन संस्थेच्या श्रीमती संगीता गुप्ता यांनी केलेल्या प्रवचनाचा जवळजवळ १०० जिज्ञासूंनी लाभ घेतला.

आ. १४.९.२०१९ या दिवशी फरीदाबाद येथील शिव मंदिरात (शास्त्री कॉलनी, सेक्टर ७ डी) प्रवचनासह ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

इ. २४.९.२०१९ या दिवशी फरीदाबाद येथे प्रवचन करण्यात आले, तसेच याच दिवशी जीव कल्याण मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

 

३. हस्तपत्रकांचे वितरण

श्राद्ध आणि नवरात्र यांची शास्त्रीय माहिती देणार्‍या हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले.’

– कु. मनीषा माहुर, देहली (ऑक्टोबर २०१९)

Leave a Comment